Satara Assembly Election 2024 : भाजप की ठाकरेंची शिवसेना, सातारकरांचा कौल कुणाला?

Who will win in Satara BJP vs Uddhav Thackeray Shiv Sena: 'साम टीव्ही'ने विधानसभा मतदारसंघनिहाय एक्झिट पोल जाहीर केला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील संभाव्य आमदार कोण असणार याबाबतचा अंदाज या पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामध्ये सातारा मतदारसंघातून कोण विजय होणार याबाबतचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.
Shivendraraje Bhosle, Amit Kadam
Shivendraraje Bhosle, Amit KadamSarkarnama
Published on
Updated on

Saam Exit Poll : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून या निवडणुकीचा निकाल उद्या शनिवारी 23 तारखेला जाहीर होणार आहे. राज्यात कोणाचं सरकार येणार याबाबतचे विविध एक्झिट पोलकडून अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

तर 'साम टीव्ही'ने विधानसभा मतदारसंघनिहाय एक्झिट पोल जाहीर केला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील संभाव्य आमदार कोण? याबाबतचा अंदाज पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे.

या पोलमध्ये सातारा मतदारसंघातून कोण विजयी होणार याबाबतचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. सामच्या एक्झिट पोलनुसार या मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले विजयी होण्याची शक्यता आहे. त्यांना या मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य मिळण्याची शक्यता आहे.

Shivendraraje Bhosle, Amit Kadam
Prakash Ambedkar : युती की आघाडी 'वंचित'चा पाठिंबा कोणाला? निकालाआधीच आंबेडकरांनी भूमिका केली स्पष्ट

सातारा विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) विरुद्ध महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमित कदम यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र, ठाकरेंच्या शिसेनेचे उमेदवार नवखे असून ते याआधी अजित पवार गटात होते.

तिथे त्यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करत उमेदवारी मिळवली. तर दुसरीकडे भाजपचे शिवेंद्रराजे भोसले यांचा दांडगा जनसंपर्क या मतदारसंघात आहे. शिवाय त्यांच्यामागे त्यांचे बंधू उदयनराजे भोसले यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे शिवेंद्रराजे भोसले हे आमदार होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Shivendraraje Bhosle, Amit Kadam
Top 10 News : लाडक्या बहिणी तारणार? 'वंचित'चा पाठिंबा..! आंबेडकरांनी केली भूमिका स्पष्ट - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

तर मतदारसंघातील परिस्थिती पाहता शिवेंद्रराजे हेच या निवडणुकीत विजयी होतील अशा चर्चा मतदारसंघात सुरू आहेत. तर शिवेंद्रराजे केवळ जास्तीचे मताधिक्य मिळवण्यासाठी मैदानात उतरल्याची चर्चाही त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com