A tragic road accident involving a Scorpio and a truck on the newly inaugurated six-lane flyover near Karad claimed four lives and left three injured. 
पश्चिम महाराष्ट्र

Karad Accident : कराडच्या नव्या उड्डाणपुलावर भीषण अपघात! महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परतणाऱ्यांवर काळाचा घाला; चौघांचा जागीच मृत्यू

Four killed in Karad flyover accident : रात्री अकराच्या सुमारास कराड शहराजवळील उड्डाणपुलावर त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्कॉर्पिओ आणि ट्रकची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी होती की, स्कॉर्पिओचा पूर्णपणे चक्काचूर झाला. गाडीतील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

Jagdish Patil

Karad News, 21 Oct : कराडमधील काही दिवसांपूर्वीच उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या सहापदरी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गावरील या पुलावर स्कॉर्पिओ आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. दसऱ्यानिमित्त कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन घरी परतताना या मित्रांवर काळाने घाला घातला. मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील सात मित्र रविवारी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले होते.

दर्शन आटोपून रात्री ते स्कॉर्पिओ गाडीतून गावाकडे निघाले होते. रात्री अकराच्या सुमारास कराड शहराजवळील उड्डाणपुलावर त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्कॉर्पिओ आणि ट्रकची जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता एवढी होती की, स्कॉर्पिओचा पूर्णपणे चक्काचूर झाला. गाडीतील तेजस देशमुख ( वय २५), सागर निंबाळकर (२३), सुयश चिंचकर (२०) आणि रोहित धोत्रे (२१) या चार तरुणांचा मृत्यू झाला.

तर अपघातात ऋतुराज दुबळे (२१), शंतनू शिंगाडे (२०) आणि अमन तांबोळी (२३) हे तिघे जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना तातडीने नजीकच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नव्या उड्डाणपुलावरील अपघाताने सुरक्षेचा प्रश्न

कराड शहराजवळील हा सहापदरी उड्डाणपूल काही दिवसांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, पुलावर झालेल्या या भीषण अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एकाच गावातील चार तरुणांचा मृत्यू झाल्याने कातरखटाव गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT