Gokul News: 'गोकुळ'मध्ये पराभव,'पुणे पदवीधर'साठी CM फडणवीस अलर्ट; शिवसेनेचे नाराज मंत्री शंभूराज देसाईंना 'मनधरणी'साठी फोन

Pune Graduate Election 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लक्ष, 3 मंत्री, 2 खासदार अन् 10 आमदारांची ताकद असूनही महायुतीवर 'गोकुळ'ची सत्ता गमावण्याची नामुष्की ओढवली. यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस अलर्ट झाले आहे.
CM Fadnavis Shambhuraj Desai Smita Jadhav
CM Fadnavis Shambhuraj Desai Smita Jadhav Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Kolhapur News: कोल्हापूरसह राज्याच्या राजकारणात यंदाची गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रचंड गाजली. भांडणं, नाराजी,कुरघोडी,युती-आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला यांसारख्या विविध कारणांमुळे गोकुळची निवडणूक प्रतिष्ठेची बनली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं लक्ष, 3 मंत्री, 2 खासदार अन् 10 आमदारांची ताकद असूनही महायुतीवर 'गोकुळ'ची सत्ता गमावण्याची नामुष्की ओढवली. यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस अलर्ट झाले आहे.

गोकुळमधील पराभवाची गंभीर दखल घेत महायुतीच्या पुणे शिक्षक आणि पदवीधरच्या उमेदवारांसाठी भाजपनं एक पाऊल मागे घेतलं आहे. काही महिन्यांपूर्वी साताऱ्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवरून पेटलेला वाद आणि आता शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीवरून सुरू असलेल्या नाराजीनाट्यानंतर शिवसेनेकडून अद्यापही पदवीधर उमेदवार स्मिता जाधव यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला नव्हता.

त्यातच भर म्हणून डॉक्टर स्मिता जाधव या सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी नामदार शंभूराज देसाई यांची पहिल्या दिवशी भेट घेणे टाळले होते. याबाबतची नाराजीही मंत्री शंभूराज देसाई यांनी बोलून दाखवली होती. त्यानंतर स्मिता जाधव यांनी देसाईचं निवासस्थानही गाठल्याचं दिसून आलं होतं. पण तरीही शंभूराज देसाई आणि शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यातच होती.

मात्र, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पुणे पदवीधरच्या निवडणुकीदरम्यान उठलेल्या सर्व वादावर लक्ष घालावं लागलं आहे. मुख्यमंत्र्यांनी नामदार शंभूराज देसाई यांना अखेर फोन करून झालेल्या सर्व प्रकरणांनंतर येणाऱ्या काळात महायुतीमध्ये साताऱ्यात कोणताही वाद होणार नाही याची जबाबदारी मी घेतो असा शब्द दिला आहे.

CM Fadnavis Shambhuraj Desai Smita Jadhav
Dasara Melava: '2019 मध्ये महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, हीच खरी व्होटचोरी...'; एकनाथ शिंदेंचा जिव्हारी लागणारा बाण

मुख्यमंत्री फडणवीसांचाच अखेर फोन आल्यानंतर शिवसेनेचा मेळावा मंगळवारी(ता.20) साताऱ्यात पडला. या मेळाव्यात शंभूराज देसाई यांनी भाषणादरम्यान, सातारा जिल्हा परिषद, आगामी जिल्हा बँक अशी विविध गोष्टींवरून तीव्र नाराजी व्यक्त केली. परंतु अखेर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आपण पदवीधर मतदारसंघात डॉक्टर स्मिता जाधव यांना निवडून द्यावे अशी विनंती कार्यकर्त्यांना केली आहे.

गोकुळच्या निवडणुकीत कॅबिनेट मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते यांचे पुत्र आणि विद्यमान अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. गोकुळमधील हा निकाल थेट मुश्रीफांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील वर्चस्वालाच एकप्रकारे हादरा मानला जात आहे. आता हसन मुश्रीफांनी या निवडणुकीतील पराभवानंर पहिली प्रतिक्रिया देताना या निवडणुकीत महायुतीमध्ये शेवटपर्यंत सुरू असलेली भांडणे आणि त्यानंतर झालेली युती कदाचित लोकांना आवडलेली नसावी असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

CM Fadnavis Shambhuraj Desai Smita Jadhav
Sanjay Raut: संजय राऊतांनी 'रिजीम' बदलण्याचा केला पुनरुच्चार; "PM मोदी पायउतार होणार", या भाकितासह थेट तारीखचं सांगितली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com