Manoj Jarange Patil : एकनाथ शिंदेंनी 500 कोटी घेतल्याच्या जरांगेंच्या आरोपावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं...

BJP on Manoj Jarange Patil : "शिंदेसाहेब, तुम्ही माझ्या नावाने भाजपच्या नेत्यांकडून पैसे घेतले आहेत. भाजपच्या नेत्यांना मनोज जरांगेंना पैसे द्यायचे आहेत, असे सांगून तुम्ही हे पैसे घेतले का? हे खरं आहे की खोटं, याचं उत्तर आजच्या दसरा मेळाव्यात द्या. अन्यथा उद्या संध्याकाळपर्यंत तरी याबाबत खुलासा करा."
Eknath Shinde-Manoj Jarange Patil
Eknath Shinde-Manoj Jarange PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Manoj Jarange Allegations : नारायणगडावरील दसरा मेळाव्यातून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांवरून गंभीर आरोप केले होते. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांकडून मनोज जरांगे यांच्या नावाने 500 कोटी रुपये घेतल्याचा दावा जरांगे यांनी केला होता.

त्यांच्या या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. आता या प्रकरणावर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगेंचे आरोप फेटाळून लावले आहेत. जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात बोलताना, दिल्लीतील भाजपच्या काही नेत्यांना आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना शिंदे यांनी जरांगे यांना 500 कोटी रुपये द्यायचे असल्याचे सांगितल्याचा आरोप केला होता. तसेच, भाजपच्या नेत्यांकडून हे पैसे घेतल्याची चर्चा असल्याचेही जरांगे म्हणाले.

"शिंदेसाहेब, तुम्ही माझ्या नावाने भाजपच्या नेत्यांकडून पैसे घेतले आहेत. भाजपच्या नेत्यांना मनोज जरांगेंना पैसे द्यायचे आहेत, असे सांगून तुम्ही हे पैसे घेतले का? हे खरं आहे की खोटं, याचं उत्तर आजच्या दसरा मेळाव्यात द्या. अन्यथा उद्या संध्याकाळपर्यंत तरी याबाबत खुलासा करा," असे आव्हान जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले होते.

Eknath Shinde-Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil : "एकनाथ शिंदेंनी माझ्या नावाने भाजपकडून 500 कोटी घेतले..."; मनोज जरांगेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

इतकेच नव्हे, तर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून 500 कोटी रुपये पोहोचल्याचे भाजपच्या नेत्यांना सांगण्यात आल्याचा दावाही जरांगे यांनी केला. "जर हे पैसे मला दिले नसतील, तर भाजप तुम्हाला संपवत आहे की तुम्ही मला संपवत आहात, याचा छडा लावल्याशिवाय मी राहणार नाही," असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, जरांगे यांच्या या आरोपांवर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हे आरोप पूर्णपणे तथ्यहीन असल्याचे सांगत त्यांच्याकडे या प्रकरणाची कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, या आरोपांबाबत एकनाथ शिंदेच सविस्तर खुलासा करू शकतील, असेही महाजन म्हणाले.

Eknath Shinde-Manoj Jarange Patil
Gokul News: 'गोकुळ'मध्ये पराभव,'पुणे पदवीधर'साठी CM फडणवीस अलर्ट; शिवसेनेचे नाराज मंत्री शंभूराज देसाईंना 'मनधरणी'साठी फोन

"जरांगे पाटील यांनी आमच्यात भांडणे लावू नयेत. मात्र, तसे काही होणार नाही. कोण कशाला 500 किंवा 1000 कोटी रुपये देईल? जरांगे पाटील यांच्याकडे या आरोपांचे पुरावे असतील, तर त्यांनी ते सादर करावेत," असं म्हणत महाजन यांनी जरांगेंचे आरोप फेटाळले. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com