P. N. Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

P. N. Patil News : करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन पाटलांना मोठी दुखापत; रुग्णालयात दाखल!

Rahul Gadkar

Kolhapur Political News : करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पांडुरंग.एन. पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या कोल्हापुरातील ऍस्टर आधार या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

करवीर विधानसभाचे आमदार पी एन पाटील(P. N. Patil) हे रविवारी सकाळी घरी असताना पाय घसरून पडल्याची माहिती समोर आली आहे. त्यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी कोल्हापूरात पसरली त्यामुळे त्यांच्या कार्यकर्ते आणि समर्थकांनी राजारामपुरी येथे त्यांच्या राहत्या घरी आणि फुलेवाडी नाका येथे गर्दी केली होती. दरम्यान डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू ठेवले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची ही सांगण्यात येते आहे.

दरम्यान आमदार पी एन पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावरती उलटसुलट चर्चा होत आहे. त्यामुळे त्यांची चिरंजीव राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी आवाहन केले आहे.''आमदार पी. एन. पाटील आज सकाळी अचानक पाय घसरून पडल्याने तब्येत ठीक नाही. याबाबत ऍस्टर आधार येथे उपचार झालेले आहेत. त्यांची तब्येत ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना विश्रांतीची गरज आहे. तरी कृपया कोणीही काळजी करू नका. विचारपूस करण्यासाठी कार्यालयावर फोनवरून संपर्क करावा. ही नम्र विनंती.'' असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT