Karmala Politics : करमाळ्यातील पक्षांतराचा फायदा मोहिते पाटलांना होणार की निंबाळकरांना?

Madha Lok Sabha Constituency 2024 : लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर या पक्षांतराचा निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून इच्छुकांकडून विधानसभेची तयारी झाल्याचे दिसून आले.
Ranjitshinh Naik Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil
Ranjitshinh Naik Nimbalkar-Dhairyasheel Mohite PatilSarkarnama

Karmala, 19 May : माढा लोकसभा निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदार संघाने सर्वांचेच विशेष लक्ष वेधून घेतले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार नारायण पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. शिवसेनेसोबत असलेल्या साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर या पक्षांतराचा निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) माध्यमातून इच्छुकांकडून विधानसभेची तयारी झाल्याचे दिसून आले. करमाळा तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना मताधिक्य मिळण्याची दाट शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकरही (Ranjitshinh Naik Nimbalkar) आघाडी घेतील, असाही दावा करण्यात येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ranjitshinh Naik Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil
NCP's CM : ‘उद्धव ठाकरेंनंतर पुढची अडीच वर्षे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता; पण ते अजितदादा नव्हते, तर...’

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार होते. या निवडणुकीत रश्मी बागल यांनी संजय शिंदे यांचा प्रचार केला होता, तर माजी आमदार नारायण पाटील हे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर होते. या निवडणुकीत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले. मागील निवडणुकीतील एकमेकांचे विरोधक आमदार संजय शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर एकाच व्यासपीठावर होते.

Ranjitshinh Naik Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil
Tawde Meet Raj Thackeray : मुंबईत मतदानाला अवघे काही तास उरले असताना तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबरोबर आमदार संजय शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, रश्मी बागल, दिग्विजय बागल हे होते. मात्र त्यांचे एक चिरंजीव माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप हे मोहिते पाटलांच्या स्टेजवर होते, तर त्यांचे दुसरे चिरंजीव भाजपचे जिल्हा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप हे भाजपच्या व्यासपीठावर होते. जयवंतराव जगताप यांनी निंबाळकरांच्या एका सभेला हजेरी लावली, त्यानंतर ते प्रचारात दिसले नाहीत.

दुसरीकडे माजी आमदार नारायण पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धैर्यशील मोहिते पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल, याच्यासाठी यंत्रणा राबवली. करमाळ्यातील विविध संघटनांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला. या निवडणुकीत आमदार शिंदे व बागलांचे काही समर्थक कार्यकर्ते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सक्रिय असल्याचे दिसून आले. याचा फटका निश्चितच भाजपचे उमेदवार निबाळकर यांना बसू शकतो.

Ranjitshinh Naik Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil
Pandharpur-Mangalvedha : पंढरपूर-मंगळवेढ्यातील राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची स्पेस कोण भरून काढणार?

करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेतल्या, तर भाजपकडून आमदार प्रसाद लाड यांनी बागल समर्थकांच्या सभेला हजेरी लावली. याशिवाय भाजपच्या एकाही बड्या नेत्याची सभा करमाळ्यात झाली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार होती. त्याची तारीखही जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर मात्र ही सभा रद्द झाली. एकूणच करमाळा तालुक्यात स्थानिक नेते मंडळींनी आपापली प्रचार यंत्रणा मोठ्या ताकतीने राबवलेली दिसून आली. निवडणूक काही दिवसांवर राहिले असता बागल यांच्या मकाई सहकारी साखर कारखान्याला झालेल्या कर्जाची उपलब्धता आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवलेले पैसे यामुळे निश्चितच भाजपचे उमेदवार निंबाळकर यांना फायदा होणार आहे. बागल यांनी सर्व कार्यकर्त्यांना ताकतीने निवडणुकीत काम करण्याचे आदेश दिले होते.

Edited By : Vijay Dudhale

Ranjitshinh Naik Nimbalkar-Dhairyasheel Mohite Patil
Sharad Pawar Vs Anna Hazare : अण्णा हजारे आता आहेत कुठे? शरद पवार, असे का म्हणाले...?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com