करवीर विधानसभा मतदारसंघातील लढत भावनिकतेच्या मुद्द्यावर लढली जात आहे. दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे पुत्र आणि काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घालत प्रचाराचा मुद्दा हाताळला आहे. दुसरीकडे मतदारसंघातील विकास कामाची शिदोरी घेत महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी मतदारापर्यंत पोहचले आहेत. करवीरचे मतदार भावनिकतेला की विकासाला महत्व देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
करवीर मतदारसंघात अकरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र खरी लढत महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल पाटील विरुद्ध महायुतीचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याच आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेला जनसुराज्यने देखील या मतदारसंघात बंडखोरी करत व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे यांना उमेदवारी दिली आहे.
मतदान प्रक्रियेला दोन दिवस शिल्लक असताना संताजी घोरपडे यांच्यावर झालेला हल्ला तितकाच करवीरच्या राजकीय दिशेला कलाटणी देणार आहे. नरके यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर झालेला हल्ला कोणी केला याबाबत ही साशंकता आहे. या तिन्ही उमेदवारांमध्ये आरपारची आणि अस्तित्वाची लढाई सुरू झालेली आहे.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य देणारा करवीर विधानसभा मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत दिशा बदलेल का याची उत्सुकता आहे.साहेबांच्या माघारी आता आमची जबाबदारी, अशी भावनिक साद घालून राहुल पाटील यांनी करवीरमधील वातावरण चांगलेच कव्हर केले आहे.
चंद्रदीप नरके यांनी वेळ आपली आहे, अशी साथ घातली आहे. मात्र राहुल पाटील यांच्याकडून याच टॅगलाईनला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आपल्या वडिलांच्या मृत्यूची वाट पाहत होते का? अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र त्याचा फटका नेमका कोणाला बसणार यावर देखील गणित अवलंबून आहेत.
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अस्तित्व नसले तरी शेकाप आणि पवार यांना मानणारा गट वेगळा आहे. शिवाय निष्ठावंत शिवसैनिक या मतदारसंघात जागरूक आहे.
करवीर मतदारसंघातील लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी, कोल्हापूर गगनबावडा राज्य मार्ग, यासह अनेक विकास कामांची प्रचंड मेहनत ही नरके यांच्या जमेची बाजू आहे. यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. पन्हाळ्यातून कोरे गटाचे मतदान निवडणुकीतील विजयाचे चित्र बदलणार असल्याची स्थिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.