Pratik Bondre, Pooja Bondre Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karad News : कासारशिरंबेतील बहीण-भाऊ झाले अधिकारी; बोंद्रे कुटुंबीय आनंदले

Puja Bondre पूजा हिने आपल्या भाऊ प्रतीकच्या मार्गदर्शनाने व सल्ल्याने अभ्यास करून कमी वेळात महाराष्ट्र शासनाच्या टॅक्स असिस्टंट या पदास गवसणी घातली.

Umesh Bambare-Patil

-राजेंद्र ननावरे

Karad News : सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून त्यांनी कष्ट, प्रयत्न, करून अहोरात्र मेहनत घेऊन कासारशिरंबे येथील बोंद्रे घराण्यातील प्रतीक व पूजा या बहीण-भावाची स्पर्धा परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक व टॅक्स असिस्टंट या पदासाठी निवड झाली. गावच्या इतिहासात पहिल्यांदाच बहीण-भाऊ अधिकारी झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

कासारशिरंबे येथील ज्येष्ठ नेते पांडुरंग बोंद्रे यांचा नातू व नात व मानसिंग बोंद्रे यांचा मुलगा व मुलगी यांची शासनाने घेतलेले स्पर्धा परीक्षेतील MPSC पोलिस उपनिरीक्षक PSI व टॅक्स असिस्टंट या पदासाठी निवड झाली. या दोघा बहीण-भावांनी जिद्द, कष्ट, प्रयत्न, धाडस आणि चिकाटीने अभ्यास केला व या त्यांच्या कष्टाला, अहोरात्र मेहनतीला फळ मिळाले.

प्रतीक यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास करीत करीत महाराष्ट्र शासनाच्या राज्यसेवा परीक्षामधील पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उच्च गुणांनी उत्तीर्ण झाला. तो राज्यसेवाच्या वर्ग एक या पदासाठी मुख्य परीक्षेचा अभ्यास करीत आहे. त्याची बहीण पूजा हिने आपल्या भाऊ प्रतीकच्या मार्गदर्शनाने व सल्ल्याने अभ्यास करून कमी वेळात महाराष्ट्र शासनाच्या टॅक्स असिस्टंट या पदास गवसणी घातली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोघा बहीण-भावांनी गावात, कऱ्हाड तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून त्यांनी कष्ट, प्रयत्न, करून अहोरात्र मेहनत घेऊन परीक्षा उत्तीर्ण होऊन या पदांवर उच्च गुणांनी निवड झालेली आहे. त्याबद्दल त्या दोघा बहीण-भावांचा सत्कार ॲड. वसंतराव मोहिते, डॉ. संतोष सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT