MPSC News : ही तर शोकांतिका! 600 जागा रिक्त, पण कृषीच्या एकाही पदासाठी नाही जाहिरात

Rohit Pawar : आयोगाने काढलेल्या जाहिरातीवर रोहित पवारांकडून टीका...
Rohit Pawar, Nana Patole
Rohit Pawar, Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Recruitment News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) शुक्रवारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिध्द केली आहे. एकूण 274 पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. पण त्यावरून आता राजकारण तापलं आहे. अत्यंत कमी पदांसाठी जाहिरात आणि कृषी संवर्गाच्या एकाही पदासाठी जाहिरात नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी राज्य सरकार टीकेची झोड उठवली आहे.

आयोगाने (MPSC) काढलेल्या जाहिरातीनुसार राज्यसेवेच्या 205 पदांसाठी तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संवर्गाच्या 26 आणि वनसेवा संवर्गाच्या 43 जागांची परीक्षा होईल. कृषी संवर्गाची एकही जागा भरली जाणार नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ही शोकांतिका असल्याचे म्हटले आहे.

Rohit Pawar, Nana Patole
Shivsena politics : काय विकास केला? समोरासमोर चर्चेला या, ठाकरे गटाचे चॅलेंज

सरकारने राज्यसेवेच्या केवळ 205 जागांची जाहिरात काढून आपले युवाविरोधी धोरणच जाहीर केले असल्याची टीका पवारांनी केली आहे. नऊ संवर्गांपैकी फक्त तीन संवर्गांचाच जाहिरातीत समावेश करण्यात आला आहे. राज्यसेवा संवर्गातील एकूण 34 पदांपैकी फक्त बारा पदांचा/संवर्गांचा जाहिरातीत समावेश करण्यात आलेला आहे. त्यातही डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, Excise SP, CO-1 यासारख्या पदांची एकही जागा नाही, अशी नाराजी पवारांनी व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सर्व 34 पदांसहित/संवर्गासहित 1 हजार जागांची राज्यसेवा परीक्षेची जाहिरात ही विद्यार्थ्यांची रास्त मागणी आहे. 600 पेक्षा जास्त जागा रिक्त असताना भारतासारख्या कृषीप्रधान देशात कृषी सेवा संवर्गातील एकाही पदाचा समावेश नसणे ही शोकांतिका आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर सर्व संवर्गातील सर्व रिक्त पदांची मागणी पत्रके आयोगाकडे पाठवण्याची मागणीही रोहित पवारांनी केली आहे.

बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली

लाखो पदे रिक्त असताना केवळ 205 पदे म्हणजे बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. सर्व तरुणांमध्ये प्रचड रोष आहे. त्यांनी बंड पुकारून रस्त्यावर उतरण्यापूर्वी सर्व विभागांना एमपीएससीकडे त्वरित मागणीपत्रक पाठवावे, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Rohit Pawar, Nana Patole
Amol Kolhe News : खासदार अमोल कोल्हेंना पाडणार ? जुन्नरचे आमदार अतुल बेनके म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com