Political leaders from Kasegaon Zilla Parishad ncluding Jayant Patil, Sadabhau Khot, and Rahul Mahadik strategize for the upcoming women-reserved seat election in Sangli district. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

ZP Election 2025 : जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात महाडिक, खोत सुरूंग लावणार, कासेगाव जिल्हा परिषदेत धुमशान!

Kasegaon Zilla Parishad Election : आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आता आमदार सदाभाऊ खोत, राहुल महाडिक सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत. यंदा जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाचे आरक्षणदेखील महिला प्रवर्गाकरिता राखीव असल्याने वाळवा तालुक्यातील दक्षिण भाग व कासेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्यपदासाठी इच्छुकांची चर्चा सुरू झाली आहे.

Rahul Gadkar

Sangli News, 29 Oct : मागील काही वर्षांमध्ये राज्यातील महाविकास आघाडीचा फायदा राज्यातील अनेक जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला. त्यातच सांगली जिल्ह्यातील कासेगाव जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला.

माजी मंत्री आणि आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात मात्र आता आमदार सदाभाऊ खोत, आणि राहुल महाडिक सुरुंग लावण्याच्या तयारीत आहेत. यंदा जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाचे आरक्षणदेखील महिला प्रवर्गाकरिता राखीव असल्याने वाळवा तालुक्यातील दक्षिण भाग व कासेगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्यपदासाठी इच्छुकांची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कासेगाव जिल्हा परिषद गटात भाजप व महायुतीला रणनीती आखावी लागणार आहे. माजी मंत्री व आमदार जयंत पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सदाभाऊ खोत, माजी आमदार मानसिंगराव नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजप नेते राहुल महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांचा कस लागणार आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सदस्यपदासाठी देवराज पाटील (कासेगाव) यांच्या पत्नी सुप्रिया पाटील, सामाजिक कार्यकर्ते अतुल लाहीगडे (कासेगाव) यांच्या पत्नी अनुपमा लाहीगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य संगीता पाटील, तर महायुतीकडून धनश्री पाटील, माधुरी जाखले, सुजाता पाटील (कासेगाव) या इच्छुक आहेत.

कासेगाव जिल्हा परिषदेचे आरक्षण जाहीर झाले. ते सर्वसाधारण महिला असे आहे. कासेगाव पंचायत समिती सर्वसाधारण महिला, तर नेर्ले पंचायत समिती सर्वसाधारण असे आरक्षण सोडतीत निघाले. कासेगाव, नेर्लेतील मातब्बरांच्या स्वतःच्या आशा धुळीस मिळाल्या. मात्र 'सौभाग्यवती'ला संधी मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. नेतेमंडळींच्या वहिनींचीच चर्चा समाज माध्यमांतून घडवून आणली जात आहे. गटात महाविकास आघाडी व महायुती असाच सामना पाहायला मिळणार आहे.

पाटील-महाडिकांची प्रतिष्ठा पणाला

भाजप प्लस महाडिक गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची कासेगाव जिल्हा परिषद मतदार संघात नेर्ले, कासेगाव येथील बरेच कामगार संस्थेत, कारखान्यात आहेत. त्यामुळे हा गट नेहमी राष्ट्रवादीच्या बाजूला झुकलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कासेगावचे देवराज पाटील, तर पेठचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT