BJP Politics : पोस्टरवर आमचा फोटो नाही म्हणत भाजप पदाधिकाऱ्यांची थेट चंद्रकांतदादांकडे तक्रार, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

BJP Kolhapur conflict : आगामी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अनेक इच्छुकांनी आपापल्या प्रभागात दिवाळीनिमित्त पोस्टरबाजी केली. या पोस्टरवर केवळ भाजपच्या कमळ चिन्हाचा लोगो आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांचा फोटो लावला आहे.
BJP Kolhapur
BJP leaders’ posters displayed across Kolhapur during Diwali spark controversy, highlighting growing internal tensions ahead of the civic elections.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 29 Oct : आगामी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अनेक इच्छुकांनी आपापल्या प्रभागात दिवाळीनिमित्त पोस्टरबाजी केली. या पोस्टरवर केवळ भाजपच्या कमळ चिन्हाचा लोगो आणि जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांचा फोटो लावला आहे.

स्वतःहूनच भाजपचे उमेदवार घोषित केल्याचा समज झाल्याने भाजपमधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. भाजप हा संघटनेतील प्रमुख पदाला महत्त्व देत असल्याने या पदालाच डावलत असल्याने जुना आणि नवा वाद निर्माण झाला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात तक्रार केली असता, त्याची दखल ही घेतली नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेते यांच्यातील सुप्त संघर्ष ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाढण्याची चिन्हे आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करताना स्वतंत्रपणे होणाऱ्या बैठका, फलकांवरील फोटोवरून होणारे हेवेदावे आणि कार्यकर्त्यकडून व्यक्त केली जाणारी नाराजी यातून पक्षांर्गत वादाची ठिणगी पडल्याचे दिसून येते. भाजपमध्ये येऊन आमदार, खासदार झालेल्या लोकप्रतिनिधींचे हस्तक महापालिका क्षेत्रातील अनेकांना उमेदवारी देण्याचा शब्द देत असल्याने हा संघर्ष अधिक बळावला आहे.

BJP Kolhapur
Vijay Wadettiwar : फडणवीस सरकारला शिंगावर घेणारा काँग्रेसचा आक्रमक नेता केंद्रीय तपास यंत्रणेच्या रडारवर; थेट नोटीसच धाडली...

त्यामुळे या संघर्षांची तक्रार थेट मंत्री पाटील यांच्याकडे करत दादा आमचा फलकावर फोटो नाही. पक्षाची उमेदवारी कार्यालयातूनच जाहीर करावी हीच भूमिका आणि तक्रार मंत्री पाटील यांच्यासमोर मांडली. २००९ पूर्वी भाजपचे जिल्ह्यात आमदार नव्हते. त्यामुळे पक्षाचा जिल्हाध्यक्ष आणि संघटन सरचिटणीस हेच पक्षाचे सर्व निर्णय घेत होते.

२००९ मध्ये सुरेश हाळवणकर आमदार झाले, मात्र, इचलकरंजीमध्ये हाळवणकर आणि तत्कालीन भाजप जिल्हाध्यक्ष 'समन्वयातून निर्णय 'घेत होते. मात्र २०१४ नंतर ही परिस्थिती बदलली. अमल महाडिक आमदार झाले. मात्र तरी देखील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपवर नियंत्रण ठेवले होते. मात्र 2024 च्या निवडणुकीत दक्षिण आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून अमल महाडिक, राहुल आवाडे आमदार झाले.

BJP Kolhapur
Local Body Election : मोठी बातमी! महाविकास आघाडीला मिळाली 'बहुजन'ची ताकद; राजकीय समीकरण बदलणार!

तर चंदगडमधून शिवाजी पाटील हे देखील भाजपमध्ये सहभागी झाले. धनंजय महाडिक हे राज्यसभेचे खासदार झाले. त्यामुळे पक्षाअंती विचार करत या सर्वांचा विचार विनिमयाने निर्णय घेतले जात आहेत. त्यामुळे जुना कार्यकर्त्यांना विचारात घेतले जात नसल्याचा समज आहे. लोकप्रतिनिधींचे हस्तक' सथ्या अनेकांना उमेदवारीचे आश्षासन देत अहेत त्यामुळे पक्षातील जुने कार्यकर्ते, जिल्हा कार्यकारिणीमधील पदाधिकारी नाराज होत आहेत.

लोकप्रतिनिधींनी जुन्या कार्यकर्त्यना आणि कार्यकारिणीला विश्वात घेऊन उमेदवारी, पक्ष प्रवेश करावेत, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, 'सध्यातरी पक्षाचे नेतृत्व कार्यकर्त्यायच्या या मागणीला फारसे गांभीर्याने घेताना दिसत नाही. त्यामुळेच कार्यकर्त्याची भावना पक्षांर्गत बैठकीतून व्यक्त होताना दिसत असून पक्षातील सुप्त संघर्ष वाढत आहे.

शहरासह ग्रामीण भागातही फलकावर जिल्हाध्यक्षांचे छायाचित्र नसते. यावरही एक बैठकीमध्ये कार्यकर्त्यनी आक्षेप नोंदवला. यातूनही पक्षांतर्गत असणारा संघर्ष पुढे आला. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले माजी नगरसेवक जिल्हाध्यक्षांचे छायाचित्र वापरत नाहीत. पक्षाच्या कार्यक्रमांना येत नाहीत. यावरही आक्षेप घेण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com