INDIA Alliance Manifesto for Bihar Election : बिहार विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी एनडीए आणि इंडिया आघाडीकडून भरघोस आश्वासनं दिली जात आहेत.
अशातच काल (ता.29) 'इंडिया' आघाडीने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. 'तेजस्वी प्रण' या नावाने हा 32 पानी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये मतदारांना सरकारी नोकऱ्या, मोफत वीज, जुनी पेन्शन योजना यासह अनेक आश्वासन देण्यात आली आहेत.
हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना 'इंडिया' आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमदेवार तेजस्वी यादव यांच्यासह घटक पक्षांचे नेते उपस्थित होते. या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे आणि 200 युनिटपर्यंत मोफत वीजेचं आश्वासन देण्यात आलं आहे.
शिवाय इंडिया आगाडी सत्तेवर येताच 20 दिवसांच्या आत सरकारी नोकरीसंबंधी रोजगार हमीचा कायदा केला जाईल आणि 20 महिन्यांच्या ही योजना लागू केली जाईल असे असं तेजस्वी यादव यांनी सांगितलं.
तसंच यावेवेळी त्यांनी राज्यात दारुबंदीचा कायदा सपशेल अपयशी ठरला असून, आम्ही तो रद्द करू, असं मोठं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे आता एनडीएला बिहारमधून हद्दपार करण्यासाठी इंडिया आघाडीने मोठा प्लॅन तयार केल्याचं दिसत आहे.
दारुबंदीचा कायदा रद्द करण्यासह राज्य सरकारच्या सर्व विभागातील कंत्राटी कामगारांना कायम करणार, जीविका दिदींनाही नोकरीत कायम करत त्यांना दरमहा तीस हजार रुपये पगार देण्यासह, राज्यात आयटी पार्क, दुग्ध, कृषी आधारित उद्योग, एज्युकेशन सिटी आणि 5 नवे द्रुतगती मार्ग उभारण्याचं आश्वासन इंडिया आघाडीने दिलं आहे. त्यामुळे आता दारुबंदीचा कायदा रद्द करणार या आश्वासनाचा इंडिया आघाडीला फायदा होणार की तोटा? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.