Anil Babar, Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khanapur By Election News: पोटनिवडणुकीसाठी महायुतीची फिल्डिंग; खानापुरात आले 700 EVM मशीन

Anil Kadam

Sangli News : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे. पोटनिवडणुकीसाठी सोलापूर येथून 700 ईव्हीएम मशीन आणत त्याची तपासणी करण्यात आली. पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे, त्यासोबत खानापुरची पोटनिवडणूक घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रयत्न आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाने पंधरा दिवसांपूर्वी खानापूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी माहिती मागवली होती. जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघाची माहिती देवून पोटनिवडणुकीची तयारी सुरु केली आहे. सोलापूर येथून 700 ईव्हीएम मशीन उपलब्ध झाले आहेत. त्यामध्ये बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांचा समावेश आहे. त्याची तांत्रिक तपासणी करुन खानापुरातील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाकडून ज्या पद्धतीने सूचना दिल्या जातील. त्याप्रमाणे पोटनिवडणुकीची कार्यवाही केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खानापूर-आटपाडीचे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचे 31 जानेवारी रोजी निधन झाले होते. त्यांच्या रिक्त जागी निवडणूक होणार नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगाने Election Commission ईव्हीएम मशीन उपलब्धकरुन दिल्यामुळे पोटनिवडणूक होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. बाबर यांचे कनिष्ठपूत्र सुहास बाबर यांनी आपल्या वडिलांच्या प्रत्येक निवडणुकीत तळागाळात जावून काम केले आहे. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असताना त्यांना काम करण्याची मोठी संधी मिळाली. बाबर यांचे विचार आणि त्यांचे काम त्यांच्या कुटुंबीयांना पुढे चालवावे लागणार आहे. त्यामुळे सुहास हे तयारीत आहेत. मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांचे कार्यकर्ते आहेत.

सध्याच्या सरकारची मुदत ऑक्टोंबरमध्ये संपणार आहे. नवीन आमदाराला सहा महिन्याचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दिवंगत अनिल बाबर हे शिंदे गटाचे आमदार होते. याशिवाय भाजपचे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याशी जवळीक होती. या कारणांनी बाबर गटाला पोटनिवडणुकीच्या माध्यमातून चाल देण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी लोकसभेबरोबर खानापूर पोटनिवडणूक घेण्याच्या हालचाली सुरु आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी सांगलीत

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या (Loksabha By-election) तयारीचा आढावा घेण्यासाठी अप्पर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे जिल्हा दौर्‍यावर येणार आहेत. ते यावेळी निवडणुकीसाठी गठित विविध समित्यांचे व पोलिस प्रशासनाचे नोडल अधिकार्‍यांशी संवाद साधणार आहेत.

Edited By - Rashmi Mane

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT