Sangli News : हमीद शेख
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक हालचालींना गती आली आहे. आटपाडी तालुक्याच्या पश्चिम भागातील खरसुंडी जिल्हा परिषद गटात महायुतीच्या घटक पक्षातच लढत होण्याची चिन्हे आहेत. आरक्षण काय पडते? यावर बरेचसे अवलंबून आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सत्ताधारी महायुतीच्या घटक पक्षातच खरसुंडी गटात निवडणूक रंगणार आहे. स्थानिक गाव पातळीवर पक्षाचा अजेंडा न बघता कोणत्याही उमेदवारास पाठिंबा दिला जातो आणि त्याचे काम करण्यात येते. यावेळी देखील तसेच घडण्याची शक्यता आहे.
कित्येक वर्षे खरसुंडी जिल्हा परिषद गटावर काँग्रेसचे दिवंगत लोकनेते मोहन काका भोसले यांचे वर्चस्व होते. त्याच्या निधनानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी या गटात आपली ताकद वाढवली. याचा प्रत्यय गतवर्षीच्या निवडणुकीत दिसून आला. गत निवडणुकीत त्यांचे वारस व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयदीप भोसले यांनी उमेदवारी केली. मात्र, त्यांना पराभवास सामारे जावे लागले. तरीपण खरसुंडी गणात पंचायत समिती सदस्या सारिका भिसे यांना निवडून आणण्यात भोसले यांना यश आले.
काँग्रेसचे वर्चस्व खरसुंडी गटात अजूनही टिकून आहे. घरनिकी गणात भाजप पडळकर बंधूनी वर्चस्व चांगलेच टिकवले आहे. तालुक्यात भाजपचे वर्चस्व सध्या आहे. मात्र भाजप पक्षाचे वर्चस्व असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत या पातळीवर कार्यकर्ते व नेते मंडळी काम करत नाहीत. स्थानिक उमेदवाराचा विचार करून काम करत असतात.
गेल्या महिन्यात माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. राष्ट्रवादीचे वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये याच आठवड्यात प्रवेश केला. या प्रवेशामुळे मतदार व कार्यकर्ते ठरावीक सोडले तर इतर विखुरले गेले आहेत. तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर व त्यांचे खंदे समर्थक आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांनी चांगलीच टीम वर्क आहे.
आमदार बाबर यांनी प्रत्येक गावात विकासकामे केल्याने त्यांचा गट चांगलाच आबाधीत आहे. खरसुंडी जिल्हा परिषद गटात शिवसेनेचे चांगलेच नेटवर्क आहे. आमदार अनिलराव बाबर यांना व विद्यमान आमदार सुहास बाबर यांनाही विधानसभा निवडणुकीत जाहीर पाठिंबा काँग्रेसचे जयदीप भोसले यांनी दिला आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद गटात काँग्रेस व शिवसेनेची ताकद जास्त आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व काँग्रेस या विचाराचा उमेदवार आणि भाजप पक्षाकडून पडळकर बंधू इच्छुक उमेदवार आरक्षण जाहीर होताच निश्चित करण्यात येईल.
मात्र, सध्या इच्छुकांमध्ये काँग्रेस पक्षाचे जयदीप भोसले, शिवसेनेचे चंद्रकांत भोसले, साहेबराव चवरे व मदन कातुरे तर भाजप तर्फे ब्रह्मानंद पडळकर, पक्षाचे जिल्हा संघटन महामंत्री व सरचिटणीस विलास काळेबाग व कैलास वाघमारे आहे. आरक्षण काय पडते याचे ठोकळे बांधून सध्या चाचणी उमेदवाराची करण्यात येत आहे. यामध्ये माजी आमदार देशमुख व माजी आमदार सदाशिव पाटील, वैभव पाटील स्थानिक पातळीवर कोणास मदत करणार हे निर्णायक ठरू शकते.
खरसुंडी जिल्हा परिषद गटात खरसुंडी व घरनिकी गण येतात. खरसुंडी गणात खरसुंडी, चिंचाळे, धावडवाडी, आवटेवाडी, कानकात्रेवाडी, नेलकंजी, मिटकी, मानेवाडी तर घरनिकी गणात घरनिकी, पडळकरवाडी, पिंपळे बुद्रुक, घांणद, जांभुळणी, पारेकर वाडी, झरे, विभूतवाडी, कुरुंदवाडी या गावांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.