Kiran Lohar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरचे शिक्षणाधिकारी लोहारच्या कोल्हापुरातील घराची पाच तास झाडाझडती

सोमवारी (ता. ३१ ऑक्टोबर) रात्री सुरू दहापासून सुरू झालेली तपासणी मंगळवारी (ता. १ नोव्हेंबर) पहाटे तीनपर्यंत सुरू होती.

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : सुमारे २५ हजारांची लाच घेतना रंगहाथ पकडलेले सोलापूरचे (Solapur) प्राथमिक (Eduction) शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कोल्हापुरातील (Kolhapur) घराची कोल्हापूर एसीबीने (ACB) तब्बल पाच तास झाडाझडती घेतली. सोमवारी (ता. ३१ ऑक्टोबर) रात्री सुरू दहापासून सुरू झालेली तपासणी मंगळवारी (ता. १ नोव्हेंबर) पहाटे तीनपर्यंत सुरू होती. लोहार यांच्या स्थावर मालमत्तेचा अहवाल कोल्हापूर एसीबी सोलापूर एसीबीकडे सोपविण्यात येणार आहे. (Kiran Lohar's house in Kolhapur was searched for five hours)

किरण लोहार यांनी रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापुरात शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. या तीनही ठिकाणी ते वाद्‌ग्रस्त राहिले आहेत. सोलापुरात पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. लोहार हे मूळचे कोल्हापूरचे आहेत. कोल्हापूरमधील शिक्षक कॉलनीमध्ये त्यांचे घर आहे. त्या घराची कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासणी केली.

लोहार यांच्या घराची सोमवारी (ता. ३१ ऑक्टोबर) रात्री दहापासून मंगळवारी पहाटे तीन पर्यंत ही तपासणी सुरू होती. या तपासणीमध्ये कागदपत्रे, बॅंकांचे पासबुक आणि इतर कागदपत्रे पाहण्यात आली. ही सर्व कागदपत्रांचा अहवाल कोल्हापूर एसीबी सोलापूर एसीबीकडे सुपूर्त करणार आहे.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या तपासणीत कोणतीही रोख रक्कम आढून आलेली नाही. मात्र, घरात अनेक कागदपत्रे आढळून आली आहेत. तसेच, घराबाहेर तीन ते चार अलिशान गाड्या आहेत. स्थावर मालमत्तेचा अहवाल कोल्हापूर एसीबी ही सोलापूर एसीबीकडे सुपूर्त करणार आहे.

रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये वाद्‌ग्रस्त ठरलेले आणि पैसे घेताना पकडण्यात आलेले किरण लोहार सोलापूर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. त्याच अनुंषगाने आज त्यांच्या कोल्हापूरमधील घराची तब्बल पाच तास झाडाझडती घेण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT