Kolhapur road cracks Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prakash Abitkar news : एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना भरघोस निधी, पण काम दर्जाहीन; तब्बल 11 कोटींच्या रस्त्याला उद्घाटनापूर्वीच भेगा

Kolhapur road cracks : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार निधी मिळत नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. शिवसेना सत्तेत असल्याने पक्षाचे आमदार, मंत्र्यांना अधिक निधी मिळत असल्याचा दावा हे नेते करतात.

Rahul Gadkar

Kolhapur news : कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून अकरा कोटीहून अधिक निधीतून करण्यात आलेल्या रस्त्याचे काम दर्जाहीन झाल्याचे समोर आले आहे. राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक ते आवळी खुर्द दरम्यान भोगावती नदीवर नवीन पुलाच्या आवळी खुर्द कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याला उद्घाटनापूर्वीच काही ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे परिसरात या रस्त्याच्या कामाची जोरदार चर्चा होत आहे.

भोगावती नदीवरील हा नवा पूल आवळी बुद्रुक व आवळी खुर्द या दोन्ही गावांना जोडणारा आहे. मुख्य पूलाच्या दोन्ही बाजूला डांबरीकरण करण्यासाठी खडीकरण केले आहे . याच मुख्य रस्त्याला व रस्त्याकडेला काही ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. बाजूला खडीचे ढीग पडले आहेत. यामुळे हा रस्ता कधीही खचला जावू शकतो.

पुलाचे अद्याप अधिकृत उद्घाटन झालेले नाही, तरीही दोन्ही बाजूंनी वाहतूक मात्र येथून राजरोसपणे सुरू आहे. दररोज शेकडो पादचारी, दुचाकी आणि चारचाकी वाहने येथून प्रवास करत असतात. पुलावरील रस्त्याची स्थिती अशी असल्याने, येथून प्रवास करणाऱ्या सर्व पादचाऱ्यांनी आणि वाहनधारकांनी अत्यंत काळजीपूर्वक प्रवास करावा, असे आवाहन स्थानिक नागरिकांकडून केले जात आहे.

संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून दुरुस्ती करावी अशी मागणी दोन्ही गावातून होत आहे. आवळी खुर्दसह परिसरातील अनेक गावांच्या सुखकर प्रवासासाठी हा पूल बांधण्यात आला आहे. पण आवळी खुर्द कडे जाताना हा रस्ता पाणंदीतून गेला आहे. आवळी बुद्रुक कडून आवळी खुर्द ला जाताना अरुंद रस्ता असून वळणही आहेत त्यामुळे येथून एस.टी. व अन्य वाहतूक करताना कसरतच करावी लागणार आहे.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार निधी मिळत नसल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले आहेत. शिवसेना सत्तेत असल्याने पक्षाचे आमदार, मंत्र्यांना अधिक निधी मिळत असल्याचा दावा हे नेते करतात. पण या निधीतून झालेल्या कामांच्या दर्जाबाबत आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT