Mamata Banerjee news : पक्षफुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत ममता बॅनर्जी बंडखोरांना दाखविणार हिसका? ही निवडणूक ठरणार गेमचेंजर...

West Bengal Rajya Sabha election, TMC split : निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार उतरविल्यास त्यांना तृणमूलचे आमदार फोडावे लागतील. कदाचित भाजपकडून ऋताब्रता यांच्या गटाला 'अदृश्य' पाठिंबा दिला जाऊ शकतो.
Mamata Banerjee, Ritabrata Banerjee
Mamata Banerjee, Ritabrata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha bypoll : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. पक्षाच्या ६० हून अधिक आमदार आणि २० खासदारांनी बंड केले. राज्यसभेच्या तीन खासदारांनी पदाचा राजीनामा दिला. आता याच तीन जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकी टीएमसी अध्यक्ष ममता बॅनर्जी बंडखोरांना आपली ताकद दाखवू शकतात.

विधानसभा निवडणुकीनंतरची ही राज्यातील पहिलीच निवडणूक असल्याने त्याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राज्यसभेच्या तीन जागा असून त्यासाठी २४ जुलैला मतदान आहे. त्याच दिवशी निकालही लागेल. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे दोन उमेदवार सहजपणे विजयी होतील. मात्र, तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही.

भाजपला तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी २२२ मतांची गरज असून पक्षाकडे प्रत्यक्ष २०८ आमदार आहे. याचा अर्थ तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी १४ मतांची गरज आहे. तृणमूल काँग्रेसचे ८० आमदार असले तरी दोन गट पडले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते ऋताब्रता बॅनर्जी यांच्याकडे सुमारे ६० तर ममता बॅनर्जी यांच्याकडे २० आमदार आहेत.

Mamata Banerjee, Ritabrata Banerjee
Saayoni Ghosh news : अखेर महिनाभराने सायोनी घोष यांना आली खडबडून जाग; एका घटनेने हादरविले, थेट मुख्यमंत्र्यांना फोन...

निवडणुकीत भाजपने तिसरा उमेदवार उतरविल्यास त्यांना तृणमूलचे आमदार फोडावे लागतील. कदाचित भाजपकडून ऋताब्रता यांच्या गटाला 'अदृश्य' पाठिंबा दिला जाऊ शकतो. बंडखोर गटाने उमेदवार उतरविल्यास भाजप उमेदवार देणार नाही. ही निवडणूक बिनविरोध करण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल. मात्र, ममता बॅनर्जी यांच्याकडून ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली जाईल, असाही प्रश्न आहे.

तिसऱ्या जागेसाठी भाजप किंवा बंडखोर गटाविरोधात ममतांकडून उमेदवार दिला जाईल, अशी जोरदार चर्चा आहे. ममतादीदींकडे पुरेसे संख्याबळ नसले तर निवडणूक बिनविरोध होऊ नये, यासाठी त्या ही खेळी खेळू शकतात. यामध्ये कोणत्या गटाकडे नेमके किती आमदार आहेत, याचेही चित्र स्पष्ट होईल.

Mamata Banerjee, Ritabrata Banerjee
Priyanka Chaturvedi news : प्रियांका चतुर्वेदींचा राजकारणातून संन्यास? भाजप खासदाराच्या संस्थेत नवी सुरूवात करताच चर्चांना उधाण, थेट उत्तर दिलं...

ऋताब्रता यांच्यासमोर बंडखोर गट एकसंध ठेवण्याचे आव्हान आहे. तर ममतांनाही उरलेसुरले आमदार फुटू नयेत, यासाठी कसरत करावी लागणार आहे. त्यामुळेच राज्यसभेची निवडणूक खऱ्याअर्थाने गेमचेंजर ठरणार आहे. यामध्ये भाजप बंडखोर गटाची मदत घेणार की त्यांना मदत करणार, ममता बॅनर्जी यांच्या बाजूने नेमके किती आमदार आहेत, याचाही निकाल लागणार आहे. ममता बॅनर्जी या सहजासहजी हार मानणाऱ्या नेत्या नाहीत. त्यामुळे त्या या निवडणुकीत उमेदवार उतरवतील, अशी अधिक शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com