Kolhapur BJP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur BJP: इचलकरंजीत भाजपच्या गुप्त बैठकीत नेमके घडले काय? वरिष्ठांनी खडसावताच नेत्यांची भूमिका मवाळ

Kolhapur BJP: इचलकरंजी शहरात सर्वाधिक मजबूत असलेल्या भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सातत्याने स्वबळाचा नारा देण्यात येत होता.

Rahul Gadkar

इचलकरंजी शहरात सर्वाधिक मजबूत असलेल्या भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सातत्याने स्वबळाचा नारा देण्यात येत होता. आमदार राहुल आवाडे यांच्यासह प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर गट प्रबळ असल्याने महापालिकेत स्वबळाचा फायदा होण्याचा विश्वास भाजपच्या स्थानिक प्रमुख नेत्यांना होता. त्यामुळे सुरुवातीपासून पहिला महापौर भाजपचाच होणार, असा दावा करण्यात येत होता. त्यामुळे भाजप स्वबळ आजमावण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत होती.

मात्र, वरिष्ठ मंत्र्यांनी महायुतीत मिठाचा खडा पडू याची खबरदारी घेत हस्तक्षेप करत भाजपच्याच नेत्यांचा चांगलाच समाचार घेतल्याची चर्चा इचलकरंजी शहरात आहे. त्यानंतर झालेल्या घडामोडीत मात्र आता नव्या राजकीय घडामोडीनंतर भाजपचा स्वबळाचा नारा घेवून मागे पडल्याची ठोस माहिती समोर येत आहे. पक्षाच्या एका उच्चस्तरीय बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशीच लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

महायुती झाल्यानंतर घटक पक्षात भाजप हाच मोठा भाऊ असणार आहे. दरम्यान, या गुप्त बैठकीत नेमके काय झाले याची दबक्या आवाजात भाजपच्या वर्तुळात चर्चा सुरू आहे. ही बैठक राज्याचे उच्च शिक्षण तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुप्त पद्धतीने पार पडली. या बैठकीला इचलकरंजी शहरातील भाजपचे वरिष्ठ आणि प्रमुख नेते उपस्थित होते. भाजपने सातत्याने स्वबळाचा नारा दिल्यानंतर महायुती मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी गोटामध्ये देखील भाजपच्या नेत्यांबाबत नाराजी होती. राज्यस्तरावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढत असताना एकट्या इचलकरंजी शहरात भाजप तो बाळाचा नारा कसा काय देऊ शकते? सवाल महायुतीमधील इतर पक्षांकडून विचारला जात होता. त्यावर भाजपच्या वरिष्ठ मंत्र्यांनी स्थानिक प्रमुख नेत्यांना चांगलाच जाब विचारण्याची माहिती समोर येत आहे.

मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांची भूमिका मात्र मवाळ झाली. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्येच अंतर्गत मतभेद असल्याचे समोर येत होते. आमदार राहुल आवारे आणि माजी आमदार सुरेश हळवणकर यांची दोन स्वतंत्र कार्यालय पाहायला मिळाले. चित्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने दिलेला स्वबळाचा नारा हा महायुतीला पोषक नसल्याचा अंदाज येताच वरिष्ठांनी यात हस्तक्षेप करत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून लढा असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT