Minatai Thackeray Statue: मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना; दोन्ही शिवसेना, मनसे आक्रमक; उद्धव, राज यांचाही संताप

Minatai Thackeray Statue: शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे.
Minatai Thackeray Statue
Minatai Thackeray Statue
Published on
Updated on

Minatai Thackeray Statue: शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. याप्रकारामुळं दादर परिसरात सकाळपासून तणावाचं वातावरण होतं. पण या प्रकारामुळं दोन्ही शिवसेना तसंच मनसे आक्रमक झाली आहे. या घटनेचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही संताप व्यक्त केला आहे.

Minatai Thackeray Statue
जगभरातील 'या' राष्ट्रप्रमुखांकडून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव; ट्रम्प काय म्हणालेत?

नेमकं काय घडलं?

मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कोणीतरी लाल रंग फेकल्याच्या घटनेमुळं तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. काल रात्री कोणीतरी हे कृत्य केल्याचं शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे. पण ही बाब लक्षात आल्यानंतर पुतळ्याच्या आणि चबुतऱ्याच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलं.

तसंच घटनास्थळी शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई यांनी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते देखील घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर मनसेच्या कार्यकर्त्यांसह राज ठाकरे यांनी देखील पुतळ्याला भेट दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे देखील घटनास्थळी पोहोचले. या सर्वांनी या घटनेचा निषेध केला असून संतापही व्यक्त केला.

Minatai Thackeray Statue
Raj Thackeray: मनसे भाजपपासून आणखी दूर! नव्या व्यंगचित्रातून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंच्या सूरात सूर

यावेळी शंभुराज देसाई म्हणाले, कोणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजकंटक किंवा भेकडांच्या औलादींची कोणतीच संस्कृती नसेल त्यांच्यावर कोणतेच संस्कार झालेले नसतील. पोलीस या लोकांचा शोध घेत आहेत. खासदार अरविंद सावंत म्हणाले, ही घटना अत्यंत निषेधार्ह असून सगळा प्रकार चीड आणणारा आणि संताप आणणारा आहे. माझ्या डोळ्यात सध्या अश्रू आणि त्याचबरोबर रागही आहे.

हे करण्याची हिंमत कोणी केली? हे शोधलं पाहिजे. मेरी माँ का अपमान झाला असं वारंवार म्हणणाऱ्यांनी आता यावर उत्तर दिलं पाहिजे. माँसाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा शोध घेऊन पोलिसांनी कारवाई करावी. सतत पोलिसांचा इथं पहारा असतानाही हे घटलं कसं? याची चौकशी झाली पाहिजे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सध्या रसातळाला गेली आहे.

Minatai Thackeray Statue
OBC Politics : ओबीसी नेत्यांमध्ये एकजूट नाही? काँग्रेसच्या मोर्चाआधीच भुजबळांकडून मेळाव्याचे आयोजन

उद्धव ठाकरेंचं शांततेचं आवाहन

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, "ज्याला आपल्या आई-बापाचं नाव घेण्याची लाज वाटते आणि जो कोणी लावारिस असेल त्यानंच हा प्रकार केला असेल. बिहारमध्ये ज्याप्रमाणं मोदींच्या आईचं नाव घेऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न आता महाराष्ट्रात घडवण्याचा डाव दिसतोय. शिवसैनिकांच्या भावना तीव्र असल्या तरी आम्ही सर्वांना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com