Kolhapur Mayor Rupaarani Nikam during meeting with all-party action committee regarding Kolhapur city limit expansion proposal. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rupaarani Nikam : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी हात टेकले, खासदार-आमदारही थकले... आता कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी नव्या महापौर मैदानात

Kolhapur City Limit Expansion : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी महापौर रुपाराणी निकम मैदानात उतरल्या आहेत. सर्वपक्षीय कृती समितीसह चर्चा करत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचा निर्धार व्यक्त केला.

Rahul Gadkar

Kolhapur Municipal Corporation Update : कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी अनेक वर्ष प्रयत्न सुरू आहेत. शहरातील विद्यमान आमदारांसह माजी आमदारांची भूमिका ही शहराच्या हद्दवाढीबाबत सकारात्मक आहे. मात्र शहरालगत असणाऱ्या ग्रामीण भागातील आमदारांचा या हद्दवाढीला विरोध आहे. तर अनेक लोकप्रतिनिधिनींनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे.

यामागे राजकीय स्वार्थ साधून अनेकांनी सोयीस्कर भूमिका घेतल्याने मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देखील कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत हतबल आहेत. तर रेटत खेटत का असेना शहरातील आमदार आणि खासदारांनी शहराच्या हद्दवाढीबाबत सकारात्मक प्रयत्न ठेवले आहेत. आता स्वतः महापौर रूपाराणी निकम या हद्दवाढीबाबत मैदानात उतरल्या आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावर विराजमान झाल्यानंतर रूपाराणी निकम यांनी शहराच्या हद्दवाढीबाबत कृती समिती आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. आज त्या संदर्भात सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीने नूतन महापौर रुपाराणी निकम यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने घटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप शासनावर केला. हद्दवाढ प्रलंबित राहिल्यास विकास खुंटल्याने जनचळवळ उभी राहील, असा इशारा कृती समितीने दिला.

नूतन महापौर रुपाराणी निकम यांनी हद्दवाढीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगत येणाऱ्या काळात याबाबत मुख्यमंत्र्यांसोबतही बैठक घेणार असल्याचे व्यक्त केले. त्यावर 1 एप्रिल 2027 पर्यंत हद्दवाढ न झाल्यास शहराच्या वाढीला खीळ बसेल. ग्रामीण भागातील नागरिकांच्या नाराजीत वाढ होत असून, विकासासाठी निधीची कमतरता भासत असल्याचे ते म्हणाले. या प्रक्रियेत राजकीय नेत्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्वरित कारवाईची मागणी कृती समितीने केली.

वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चेचा मानस..

महापौर निकम यांनी हद्दवाढीच्या पुढील पायऱ्या जाहीर केल्या आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा करणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन बैठकीतून हा प्रश्न ठोस निकाली काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे नूतन महापौरांच्या नेतृत्वात आता राजकीय इच्छाशक्तीने हा प्रश्न निकाली निघेल का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT