MNS Kolhapur : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना मनसेच्या आंदोलनाची धास्ती? कार्यालयात आणले चक्क भाडोत्री गुंड

75 Crore Corruption Allegation : कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागात मनसेने 75 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत निवेदन दिले. अधिकाऱ्यांनी भाडोत्री गुंड बोलावल्याचा आरोप झाल्याने विभागात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
MNS workers submit memorandum at Kolhapur PWD office amid allegations of ₹75 crore corruption and heightened tension.
MNS workers submit memorandum at Kolhapur PWD office amid allegations of ₹75 crore corruption and heightened tension.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur : सार्वजनिक बांधकाम विभागातील ज्या महिला अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला त्या महिला अधिकाऱ्यांसह अनेक वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी जवळपास 75 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. इतकेच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन द्यायला गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांची धास्ती अधिकाऱ्यांनी घेतलेली दिसली. अधिकाऱ्यांनीच या कार्यालयात भाडोत्री गुंड आणून ठेवल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे या विभागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोल्हापुरातील शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत बांधकाम व रस्ते प्रकल्पात कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. 3 महिन्यापूर्वी याच प्रकरणाची माहिती घेत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्यावर एका महिला अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली होती.

आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याच महिला अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी जवळपास 75 कोटींचा घोटाळा केल्याचा प्रकार उघडकीस आणला आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासन अधीक्षक अभियंता यांना देण्यात आले. शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयात अनेक कामे सुरू आहेत. त्यामध्ये रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे व संकुलातील वाहनतळ विकसित करण्याच्या नावाखाली ठेकेदाराशी संगनमत ठेवून अधिकाऱ्यांनी जवळपास 75 कोटींचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला.

MNS workers submit memorandum at Kolhapur PWD office amid allegations of ₹75 crore corruption and heightened tension.
Rajya Sabha News: शरद पवार, आठवले यांना पुन्हा संधी? महाराष्ट्रातील सात खासदार होणार निवृत्त

रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा राबता

संबंधित प्रश्नासंदर्भात मनसेचे पदाधिकारी आज (ता.18) सार्वजनिक बांधकाम विभागात निवेदन देण्यासाठी येणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना होती. अधिकाऱ्याने देखील कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवली होती. मात्र पोलीस प्रशासनाला याची कल्पना देण्याऐवजी अधिकाऱ्यांनी संरक्षणासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगार या ठिकाणी आणून ठेवले असल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी केला.

MNS workers submit memorandum at Kolhapur PWD office amid allegations of ₹75 crore corruption and heightened tension.
Kolhapur News : कोल्हापूरमधील भोगावती कारखाना राड्याचे ZP निवडणूक कनेक्शन : राष्ट्रवादीच्या राहुल पाटलांच्या विरोधात काम केल्याचा निघाला राग

अधीक्षक अनभिज्ञ :

दरम्यान मनसेने आरोप केलेल्या अधीक्षक बुरुड यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. यावर आठवडाभरात या सर्व गोष्टींचा अभ्यास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले. मात्र अन्य प्रश्न संदर्भात आपल्याला काहीच माहिती नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com