Kolhapur News : कोल्हापूर मनपात मोठा उलटफेर! पराभूत उमेदवाराची लागली 'लॉटरी', स्वीकृत नगरसेवकांची नावे निश्चित!, कोण आहेत ते नशीबवान 8 चेहरे?

Maharashtra municipal politics : कोल्हापूर महानगरपालिकेत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. पराभूत उमेदवाराला संधी तर निष्ठावंतांचा सन्मान झाला. जाणून घ्या कोण आहेत ते 8 नशीबवान चेहरे.
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

कोल्हापूर महानगरपालिकेच्या आठ स्वीकृत नगरसेवक पदासाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत रस्सीखेचचा प्रकार आज थांबला. कारण काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेकडून आठ स्वीकृत नगरसेवकांची निवड आज निश्चित करण्यात आली आहे. काँग्रेस तीन, भाजप तीन आणि शिवसेनेने दोन स्वीकृत नगरसेवकांची निवड निश्चित केली आहे.

पक्षाच्या उमेदवारासाठी माघार घेणाऱ्यांना संधी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसकडून देण्यात आली. तर मातब्बर लढाईत शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी पराभव केलेल्या काँग्रेसचे राहुल माने यांना स्वीकृत नगरसेवक पदावर सतेज पाटील यांनी संधी दिली आहे. फेब्रुवारी रोजी महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत 81 नगरसेवक सदस्य संख्या आहे. प्रत्येक 10 नगरसेवक मागे एक स्वीकृत नगरसेवक करण्याचा नवीन नियम निघाल्याने काँग्रेसकडे तीन भाजपकडे तीन आणि शिवसेनेकडे दोन स्वीकृत नगरसेवकाचे पद केले आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणूक झाल्यानंतर या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या.

Kolhapur Municipal Corporation
New IAS Transfer Policy : मंत्री, मुख्यमंत्र्यांकडे आता वशिलेबाजी चालणार नाही! IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी राज्य सरकारचा क्रांतिकारी निर्णय

शिवाय या नावावर आपली निवड होण्यासाठी गल्लीपासून ते मुंबई पर्यंत इच्छुकांनी प्रयत्न केले होते. तर जागा वाटपामध्ये उमेदवारी न मिळाल्याने नाराज पदाधिकाऱ्यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द दिला होता. येत्या 20 फेब्रुवारी रोजी स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असल्याने आज सर्वच नावांवर पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले.

काँग्रेसकडून माजी नगरसेवक राहुल माने, ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष सुनील मोदी, सामान्य कार्यकर्ता नुसता मलबारी यांना संधी दिली आहे. राहुल माने यांनी काँग्रेसची साथ सोडलेले शारंगधर देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती मात्र त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता. सतेज पाटील यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय समजले जातात. तर दुसरीकडे ठाकरेंचे शहराध्यक्ष सुनील मोदी, मुस्ताफ मलबारी यांनी उमेदवारी मागे घेतली होती.

Kolhapur Municipal Corporation
Kolhapur Mahapalika: काँग्रेसच्या कोट्यातून ठाकरेसेनेला 'स्वीकृत' मिळाले तर आनंदच, अन्यथा सुनील मोदींचा हिशेब करणार

भाजपकडून पडद्यामागून जोडण्या लावणारे जयंत पाटील यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. जागा वाटपाबरोबरच उमेदवारी निवडीसाठी जयंत पाटील यांचे भाजपसाठी योगदान ठरले आहे. तर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या पत्नीला पक्षाच्या नियमामुळे उमेदवारी न मिळाल्याने त्यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी दिली आहे तर सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून सुनील वाडकर यांना संधी दिली आहे. शिवसेनेकडून माजी नगरसेवक रत्नेश शिरोडकर आणि प्रसाद चव्हाण यांचे स्वीकृत नगरसेवक साठी नाव निश्चित झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com