Kolhapur News: कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीचे आरक्षण सोडत आज शासकीय विश्रामगृहातील छत्रपती राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पडली. महापालिकेची निवडणूक यंदा चार सदस्य प्रभाग रचनेनुसार होणार असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून निवडणूक रखडल्याने सर्वच राजकीय पक्षांचा लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. अखेर आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी आपल्या प्रभागात थेट फटाके फोडून सलामी दिली आहे.
वास्तविक पाहता कोल्हापूर महानगरपालिकेसाठी यंदा वीस भागासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली. प्रत्येक प्रभागात अ ब क ड अशा प्रवर्गातून आरक्षण जाहीर करण्यात आले. तर प्रभाग क्रमांक 20 मधून अ ब क ड आणि ई असे प्रवार्गातून आरक्षण जाहीर करण्यात आले. वास्तविक सर्वच गटात सर्वसाधारण मतदार संघ राखीव असल्याने अनेक इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, या निवडणुकीच्या रणांगणात महायुतीसाठी सत्वपरीक्षा असणार आहे.
गेल्या दोन महिन्याचा कालावधी पाहिला तर महायुतीतील घटक पक्षात इच्छुकांचा ओढा वाढला आहे. आगामी निवडणुका या काही ठिकाणी महायुती तर काही ठिकाणी स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा घटक पक्षातील तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी केली आहे. कोल्हापुरात महायुती म्हणून लढण्याचे संकेत सध्या तरी मिळत आहेत.
महायुतीमधील भाजपमध्ये इच्छुकांना गळाला लावण्यात सुरुवात केली आहे. तर शिवसेनेमध्ये जवळपास 50 पेक्षा इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक मातब्बरांना आपल्या पक्षात घेतले आहे.
बहुतांश प्रभाग हे ड वर्गातून सर्वसाधारण झाल्याने महायुतीमध्ये ड वर्गाच्या प्रवर्गातून लढण्यासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी वाढणार आहे. आपल्याच पक्षाकडे हा प्रवर्ग राहील यासाठी नेत्यांची कसरत होणार आहे. शिवाय उमेदवारीसाठी इच्छुकांना खटाटोप करावा लागणार आहे. जर महायुती बिघडल्यास त्याला कारणीभूत ही सर्वसाधारण प्रवर्गच असू शकतो.
तर दुसरीकडे ज्या ठिकाणी पुरुष पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या रणांगणात उतरण्याची तयारी ठेवली होती. त्यांना मात्र नेत्यांच्या सूचनेनंतर माघारी घ्यावी लागणार आहे. किंवा महिला प्रवर्गातून त्यांना आपल्या पत्नी बहीण किंवा मातोश्रींना निवडणुकीच्या उतरावे लागणार आहे. मात्र तिन्ही पक्षातील हे एकमत होईल असे चित्र कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात नाही. त्यामुळे सहाजिकच महायुतीमध्ये (Mahayuti) प्रचंड चुरस निर्माण होणार आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीची परिस्थिती पाहिल्यास काँग्रेस इतर घटक पक्षांपेक्षा तुल्यबळ ठरू शकतो. शिवाय महायुतीमध्ये जे नाराज झालेले इच्छुक आहेत. ते कोणत्याही परिस्थितीत निवडणुक लढवण्यास तयार आहेत. असे इच्छुक महाविकास आघाडीतील काँग्रेसमध्ये येऊन निवडणुकीच्या रणांगणात शड्डू ठोकू शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीला महायुतीमधील जे नाराज इच्छुक आहेत. त्यांचीच आशा करावी लागणार आहे.
एकूण जागा- ८१
एकूण प्रभाग - २०
सर्वसाधारण - ४९(महिला २४)
अनुसूचित जाती- ११(महिला ६)
नागरिकांचा मागास प्रवर्ग- २१- ( महिला ११)
प्रभाग १
अ - अनुसूचित जाती
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
क- सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण
प्रभाग २
अ - अनुसूचित जाती
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग ३
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग ४
अ - अनुसूचित जाती महिला
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग ५
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग ६
अ - अनुसूचित जाती
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग ७
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण
प्रभाग ८
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
प्रभाग ९
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण
प्रभाग १०
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब -सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग ११
अ - अनुसूचित जाती महिला
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण
प्रभाग १२
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग १३
अ - अनुसूचित जाती महिला
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण
ड- सर्वसाधारण
प्रभाग १४
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण
ड-सर्वसाधारण
प्रभाग १५
अ - अनुसूचित जाती
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग १६
अ - नागरिकांचा मागास प्रवर्ग
ब - सर्वसाधारण महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग १७
अ - अनुसूचित जाती महिला
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग १८
अ - अनुसूचित जाती महिला
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
प्रभाग १९
अ - अनुसूचित जाती
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- सर्वसाधारण महिला
ड- सर्वसाधारण
प्रभाग २०
अ - अनुसूचित जाती महिला
ब - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
क- नागरिकांचा मागास प्रवर्ग
ड- सर्वसाधारण महिला
इ - सर्वसाधारण
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.