Rupali Thombre News : अजितदादांनी हकालपट्टी केल्यानंतरही रुपाली ठोंबरेंचा कॉन्फिडन्स कायम: आरक्षण जाहीर होताच तीन प्रभागांवर दावा

Rupali Thombre Patil PMC Election: राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी झालेल्या रुपाली ठोंबरे पाटील या आगामी पुणे महापालिका निवडणूक लढणार असल्याची शक्यता आहे. त्यांनी तीन प्रभागांविषयी सूचक विधान केले आहे.
Rupali Thombre
Rupali ThombreSarkarnama
Published on
Updated on

Rupali Thombre News : रुपाली पाटील ठोंबरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील चाकणकर यांच्यासोबत असलेला वाद त्यांना भोवल्याची चर्चा आहे. पक्षाने प्रवक्तेपदावरून उचलबांगडी केल्यानंतर रुपाली पाटील यांना दुसऱ्या पक्षाकडून ऑफर असल्याचे देखील सांगितले जात आहे. दरम्यान, आज पुणे महापालिकेचे आरक्षण सोडत जाहीर झाली.

आरक्षण सोडतीनंतर रुपाली ठोंबेरे यांनी फेसबूकवर पोस्ट करत मी सज्ज दमदार कामाच्या जोरावर,लोकांच्या प्रेमावर विश्वासावर, अशी पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी पुणे महापालिका निवडणूक लढण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी तीन प्रभागामधील आरक्षण देखील आपल्या पोस्टमध्ये सांगितले आहे. त्यामुळे या तीन पैकी एका प्रभागातून त्या लढतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये कसबा मतदारसंघाचा उल्लेख केला आहे. त्यातील प्रभाग क्रमांक 23प्रभाग 23 रविवार पेठ, नाना पेठ तसेच प्रभाग 25 शनिवार पेठ महात्मा फुले मंडई आणि प्रभाग 26 घोरपडे पेठ,गुरुवार पेठ समता भूमी याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या तीन पैकी एका प्रभागातून त्या निवडणूक लढतील, असे संकेत आहेत.

Rupali Thombre
Eknath Shinde Politics : एकनाथ शिंदेंनी भाजपच्या नाराज नेत्यांना आपल्याकडे ओढलं, अमरिशभाई पटेलांच्या बालेकिल्ल्याला तडा

प्रभाग क्रमांक 23 मध्ये काय स्थिती?

प्रभाग 23 रविवार पेठ, नाना पेठ प्रभागामध्ये अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधरण असे आरक्षण जाहीर झाले आहे. तर प्रभाग 25 शनिवार पेठ महात्मा फुले मंडईमध्ये चार जागांसाठी ओबीसी महिला, ओबीसी सर्वसाधारण, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

प्रभाग 26 घोरपडे पेठ,गुरुवार पेठ समता भूमी या प्रभागात अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण असे आरक्षण आहे.

शिवसेनेतून ऑफर?

रुपाली ठोंबरे पाटील यांना अनेक पक्षातून ऑफर असल्याची चर्चा आहे. विशेषत: एकनाथ शिंदेंच्या शिवसेना त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी इच्छुक आहे. मात्र, रुपाली ठोंबरे यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असून अजित पवार यांच्याशी आपले बोलने झाले असल्याचे सांगितले, दोन दिवसांत आपण त्यांची भेट घेणार आहे. अजितदादा हे न्याय करणारे व्यक्ती आहेत. ते न्याय देतील, असे देखील त्यांनी सांगितले.

Rupali Thombre
PMC Pune : पुणे मनपा निवडणुकीचं चित्र स्पष्ट; बिडकर-धंगेकर 'हाय व्होल्टेज' लढत निश्चित! मोरे पिता-पुत्र 'या' प्रभागातून मैदानात!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com