PMC Pune : पुणे मनपा निवडणुकीचं चित्र स्पष्ट; बिडकर-धंगेकर 'हाय व्होल्टेज' लढत निश्चित! मोरे पिता-पुत्र 'या' प्रभागातून मैदानात!

PMC Pune Election 2025: पुणे मनपा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. बिडकर आणि धंगेकर यांच्यात हाय व्होल्टेज लढत ठरणार असून मोरे पिता-पुत्रही मैदानात उतरले आहेत.
PMC Pune
PMC Pune Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी महापालिका निवडणुकीसाठी आज प्रारूप आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या सोडतीनंतर आता शहरातील राजकीय चित्र स्पष्ट झालं असून, कोणत्या प्रभागातून कोण उभे राहणार, कोणाची जागा राखीव होणार आणि कोणाचे राजकीय गणित बिघडणार, याबाबत स्पष्टता अली आहे. काही हाय व्होल्टेज निवडणुकांबाबत चे चित्र देखील स्पष्ट झाला आहे.

महापालिकेच्या येणाऱ्या जानेवारीतील निवडणुका चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने घेतल्या जाणार असून, एकूण १६५ नगरसेवक निवडून येतील. यासाठी ४१ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत, ज्यात ४० प्रभाग चारसदस्यीय तर आंबेगाव-कात्रज हा एकमेव पाचसदस्यीय प्रभाग आहे. सर्व जागांपैकी निम्म्या म्हणजे ८३ जागा महिलांसाठी आरक्षित राहतील. याशिवाय अनुसूचित जातींसाठी २२, अनुसूचित जमातींसाठी २ आणि ओबीसींसाठी ४४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

आरक्षण सोडतीमध्ये उलथापालक झाल्याने आरक्षण मोठ्या प्रमाणात बदलली आहेत त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांना आता सर्वसाधारण आरक्षणातून निवडणूक लढावी लागणार आहे. माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, माजी उपमहापौर सिद्धार्थ धेडे तसेच माजी नगरसेवक अविनाश बागवे, सनी निम्हण, युवराज बेलदरे, प्रकाश ढोरे आणि प्रकाश कदम यांना यापुढे सर्वसाधारण गटातूनच निवडणुकीचा सामना करावा लागेल.

बिडकर विरुद्ध धंगेकर सामना होणार !

हाय होल्टेज निवडणूक होण्याची शक्यता असलेल्या मध्यवर्ती भागातील प्रभाग क्रमांक 24 मधील आरक्षण आता स्पष्ट झाले आहे. प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती कमला नेहरू रुग्णालय या मध्ये दोन सर्वसाधारण, एक ओबीसी महिला आणि एक सर्वसाधारण महिला असा आरक्षण पडला आहे. त्यामुळे या प्रभागातून भाजपचे पुणे महापालिका निवडणूक प्रमुख असलेले गणेश बिडकर हे सर्वसाधारण जागेवरून निवडणूक लढणार आहेत. तसेच याच प्रभागातून यंदाच्या निवडणुकीत माजी आमदार रवींद्र धंगेकर हे मैदानात न उतरता आपल्या मुलाला मैदानात उतरवणार असल्याचं सांगितलं जात आहे.

PMC Pune
Pension Update : पेन्शन हवी? 30 नोव्हेंबर डेडलाईन; 'हे' काम न केल्यास बसू शकतो दणका!

मात्र या प्रभागामध्ये दोन सर्वसाधारण जागा असल्याने बिडकर आणि धंगेकर आमने सामने निवडणूक लढणार की दोन सर्वसाधारण जागांवर वेगवेगळ्या उमेदवारांविरोधात निवडणूक लढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच प्रभाग 24 च्या लागून असलेला प्रभाग 23 रविवार पेठ- नाना पेठ मधून ओबीसी महिला या आरक्षित जागेवरून धंगेकर यांच्या पत्नी देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे.

PMC Pune
Terrorist Attack Cover in Policy : दहशतवादी हल्ल्यात नुकसान झाले तर इन्शुरन्स पॉलिसीत भरपाई मिळते का? काय सांगतो नियम?

मोरे पिता-पुत्र दोन प्रभागातून मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यातील नेते असलेले वसंत मोरे हे यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 38 इ मधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्यासोबत प्रभाग क्रमांक 40 ड मधून त्यांचा मुलगा देखील यंदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं समोर आला आहे. प्रभाग क्रमांक 38 हा शहरातील सर्वात मोठा प्रभाग असून या प्रभागा मधून पाच निवडून नगरसेवक निवडून येणार आहेत. त्यामुळे या प्रभागांमध्ये वसंत मोरे यांची कसोटी लागणार आहे. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक ४० मधून आपल्या मुलाला देखील निवडून आणण्याचे शिवधनुष्य वसंत मोरे यांना पेलावं लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com