kolhapur Crime News : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे दोन मित्रांनी गाड्यांची शर्यत लावली असताना भरधाव कारने धडक दिल्याने दुचाकीवरील दाम्पत्याचा बळी गेल्याची दुर्दैवी घटना ताजी असतानाच कोल्हापुरातदेखील भीषण अपघात घडला आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, या घटनेत गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर शहरातील शिवाजी विद्यापीठ परिसरात मध्यरात्री हा भीषण अपघात झाला. पद्मसिंह रणजितसिंह पाटील हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असताना त्याने दोन तरुणांना जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये उमेश पाथरूड आणि गणेश पाथरूड या दोन सख्ख्या चुलत भावांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन तरुण मुलांचा असा अपघाती अंत झाल्याने पाथरूड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे कोल्हापुरात ड्रिंक अँड ड्राइव्हचा प्रकार उघडकीस आला असून, दोघांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. या घटनेनंतर जखमींना मदत करण्याऐवजी पद्मसिंह पाटील हा घटनास्थळावरून पळून गेल्याची चर्चा आहे.
घटनेची माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या अपघात प्रकरणात पद्मसिंह पाटील याला अटक करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.