Crime News : माजी आमदाराच्या भावाचा जुगार अड्डा, पोलीसांनी तीनदा छापा टाकला तरी खेळ सुरूच; चाळीस जणांवर गुन्हा!

Chhatrapati Sambhajinagar Crime Branch raids News : पोलीसांनी शहरात विशेष मोहिम हाती घेत जुगार अड्यांवर धाडी टाकायला सुरूवात केली आहे.
Crime News
Crime NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar : पोलीसांच्या कार्यक्षमतेवर वारंवार प्रश्न उपस्थित करून त्यांच्यावर गंभीर आरोप केले जातात. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर मद्यधुंद तरुणांनी बाटल्या फेकल्याचे प्रकरण चांगलेच गाजले. या प्रकरणावरून संजय शिरसाट यांनी थेट पोलीस आयुक्तांनाच लक्ष केले होते. त्यांचे लक्ष फक्त वसुलीकडे आहे, शहरात जुगार, अंमली पदार्थांची अवैध विक्री, गुन्हेगारी, दिवसा ढवळ्या खून होत असल्याचे सांगत पोलीसांवर हल्लाबोल चढवला होता.

आता पोलीसांनी (Police) शहरात विशेष मोहिम हाती घेत जुगार अड्यांवर धाडी टाकायला सुरूवात केली आहे. विशेष म्हणजे पोलीसांना लक्ष्य करणाऱ्या संजय शिरसाट यांच्याच शिवसेना पक्षाचे स्थानिक नेते माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्याच सख्ख्या भावाच्या जुगार अड्यावर पोलीसांनी छापा टाकला. विशेष म्हणजे गेल्या १५ महिन्यात या अड्यावरील ही तिसरी छापेमारी होती. शहरातील औरंगपुरा भागातील या जुगार अडड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (ता. 18) छापा टाकला.

या कारवाईत जुगार खेळणाऱ्या तब्बल ४० जणांवर पोलिसांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. त्यांच्या ताब्यातून एकूण ३ लाख ११ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या जुगार अड्ड्यावर गेल्या १५ महिन्यात तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आल्याचे समोर आले. औरंगपुरा येथील 'दादा डोसा' हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर काही जण पैसे लावून अवैधरित्या जुगार खेळत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.

Crime News
BJP MLA News : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; भाजप आमदाराला तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा, काय आहे नेमके प्रकरण..?

या आधारे गुन्हे शाखेचे पथक आणि 'पास २०' पथकाच्या अंमलदारांनी संयुक्तरीत्या छापा टाकला. यावेळी तेथे ४० जण पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख, मोबाईल आणि जुगाराचे साहित्य असा ३ लाख ११ हजार ५१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन कदम यांच्या तक्रारीवरुन सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर, उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर, अर्जुन कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Crime News
Shiv Sena Case : शिवसेना कोणाची? एकनाथ शिदेंची 'ती' चूक महागात पडणार, कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने धडधड वाढली

मुख्य आरोपींमध्ये तणवानींचा भाऊ..

जुगार अड्यावर धाड टाकल्यानंतर पोलीसांनी विष्णु लेखराज तनवाणी (रा. गुलमंडी), प्रकाश बाबुलाल चौधरी, आकाश शांतीलाल झाटीवाले, निलेश बबन गवळी, कलीम पठाण सलीम पठाण, रियाज मुसा शेख, रशीद खान मोहम्मद खान, अतिश विष्णू इंगळे, सोमनाथ लक्ष्मण भगत,शकील शरिफ पठाण, गुलाब संभाजी त्रिभुवन, चंद्रकांत राजु शिर्के, शेख दस्तगिर शेख जहुर, चंदर सांडु सलामपुरे (रा. पहाडसिंगपुरा), राजेश विरकिसन विठोरगे, ज्ञानेश्वर बाबुराव गिधाने, गणेश अशोक नवाते, विशाल सुरेश राचुरे.

दिलिप दौलतराव बावस्कर, संजय सुगनचंद संचेती, संदिप साधुराम मंगारामानी, राहुल रामराव गायकवाड, अजबसिंग भाऊलाल जारवाल, राजेश श्रावण वानखेडे (रा. भिमनगर), विजय कांतीलाल सुर्यवंशी, प्रकाश भिकचंद ढोले, आकाश संजय कांबळे, शेख जब्बार शेख बनेमिया, शेख युसुफ शेख हुसैन, किशोर सुरजमल जैन, एजाज खान अहमद खान, शेख रफीक शेख अब्दुल गणी, अलिम हमीद सय्यद, लक्ष्मण संदिप ठोंबरे, शेख रियाजुद्दीन शेख शमसोद्दीन, शेख तौसिफ शेख इब्राहिम, नाझिम आजिम शेख, राहुल केशवराव पगारे, सुनील पापाराव मुसळे, गोलु राधेश्याम वर्मा यांचा समावेश आहे.

Crime News
NCP Politics : राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांच्या भेटीला; सुनेत्रा पवारांच्या अनुपस्थितीचे खरे कारण समोर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.