Suicide sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : कोल्हापुरच्या माजी महापौरांच्या कुटुंबावर शोककळा: १७ वर्षांच्या नातवाचं टोकाचं पाऊल

Kolhapur Teen Suicide, Raunak Adgule Death, Mahadev Adgule Grandson: कोल्हापूरचे माजी महापौर महादेव आडगुळे यांचे नातू रौनक आडगुळे (१७) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेमुळे आडगुळे कुटुंबासह संपूर्ण कोल्हापूरमध्ये शोककळा पसरली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Teen Suicide: कोल्हापुरचे माजी महापौर आणि जेष्ठ वकील महादेव आडगुळे यांच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. नातू रौनक इंद्रजीत आडगळे (17) याने टोकाचं पाऊल उचलतं जीवन संपवलं. मिळालेल्या माहितीनुसार, रौनकने आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केली. पुढील तपासणीसाठी त्याचा मृतदेह छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय शेंडा पार्क येथे पाठवण्यात आला आहे.

रौनकचे आजोबा महादेव आडगुळे यांची कोल्हापुर पंचक्रोशीत ज्येष्ठ वकील अशी ओळख आहे. ते कोल्हापुर महापालिकेचे महापौर राहिलेले आहेत. तर रौनकचे वडिल इंद्रजीत आडगुळे हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. १७ वर्षाचा रौनक हा इंद्रजीत आडगुळे यांचा चिरंजीव तर महादेवराव अडगुळे यांचा नातू आहे.

अवघ्या १७ वर्षाच्या हसत्याखेळत्या मुलाने अशा पद्धतीने आयुष्य संपवल्याने कुटुंबामध्ये मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे. दरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रौनकने नुकतीच १२ वीची परीक्षा दिली होती. त्याच्या या टोकाच्या वागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

मागील काही वर्षांमध्ये लहान मुलांच्या आत्महत्येत वाढ झाली आहे. एकूण आत्महत्यांमध्ये ३६ टक्के आत्महत्या १९ ते ३५ वर्षे या वयोगटातील आहेत. यात १ हजार ५५५ पुरुष आणि ३१७ महिलांचा समावेश आहे. या वयोगटातील तरुण-तरुणींमध्ये स्पर्धा परीक्षांमधील अपयश, नोकरीची अनिश्चितता, प्रेयसीकडून धोका, लग्नाला होणारा उशीर आणि आर्थिक स्वावलंबनाचा वाढता ताण यामुळे नैराश्य येत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT