Lohagad Fort Accident: जयपूरमध्ये शाही विवाह, दोन विमानांचे बुकिंग; लग्नाच्या 10 दिवस आधीच लोहगडावर काळाचा घाला

Maval Accident News : मावळमधील 25 वर्षीय केतन अगरवाल याचा लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून मृत्यू झाला. अवघ्या काही दिवसांवर आलेल्या लग्नाआधी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Lohagad Fort Accident
Lohagad Fort AccidentSarkarnama
Published on
Updated on

विजय सुराणा

तळेगाव दाभाडे : अवघ्या काही दिवसांनंतर लग्नाच्या बोहल्यावर चढणार, नव्या आयुष्याची स्वप्ने पाहणार आणि होणाऱ्या पत्नीच्या हातात हात घालून संसाराची सुरुवात करणार… पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. मावळ तालुक्यातील गहुंजे येथील २५ वर्षीय केतन विशाल अगरवाल याचा लोहगड किल्ल्यावर झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला आणि आनंदाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अगरवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.

होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस

केतन हा आपल्या होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिच्यासोबत लोहगड किल्ल्यावर गेला होता. 10 दिवसानंतर त्यांचा जयपूर येथे त्याचा विवाह सोहळा होणार होता. लग्नाच्या तयारीला घरात वेग आला होता. जयपूरला जाण्यासाठी दोन विमानांचे बुकिंग झाले होते, आलिशान पॅलेस हॉल आरक्षित करण्यात आला होता. कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण होते. मात्र एका क्षणात सर्व काही बदलून गेले.

गुरुवारी सकाळी किल्ल्यावर फिरताना आणि छायाचित्रे काढत असताना केतनचा अचानक तोल गेला. पाय घसरल्याने तो खोल दरीत कोसळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांना माहिती देण्यात आली.

Lohagad Fort Accident
Shiv Sena News: ठाकरेंचा व्हीप धुडकावल्याने 6 खासदारांची सदस्यता धोक्यात? सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलंय

यानंतर शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जीव धोक्यात घालून अत्यंत कठीण परिस्थितीत बचावकार्य करण्यात आले. अखेर मोठ्या प्रयत्नांनी केतनला दरीतून बाहेर काढण्यात आले; मात्र तोपर्यंत काळाने त्याच्यावर झडप घातली होती.

या घटनेनंतर गहुंजे परिसरात शोककळा पसरली आहे. लग्नाच्या पत्रिका वाटल्या जात असताना घरात आता अंत्यसंस्काराची तयारी करावी लागल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. नव्या आयुष्याची स्वप्ने डोळ्यांत साठवणारा तरुण अशा अचानक निघून गेल्याने मित्रपरिवार आणि नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत.

Lohagad Fort Accident
Teachers News: शिक्षकांना मोठा दिलासा! अशैक्षणिक कामांना ब्रेक; आता अध्यापनासाठी अधिक वेळ

या बचाव मोहिमेत आदिती गायकवाड, वैष्णवी भांगरे, सचिन गायकवाड, विशाल पिरे, सागर ढलवी, कुणाल कडू, सागर कुंभार, योगेश साखरे, सपना कराळे, राजू कडू, योगेश ढलवी, महेश मसणे आणि सुनील गायकवाड यांनी सहभाग घेतला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. केतनचे वडील विशाल अगरवाल हे पिंपरी-चिंचवड येथे बांधकाम व्यावसायिक आहेत.

ट्रेकींगसाठी चार ते पाच व्यक्ती लोहगडावर आल्या होत्या. घसरड्या भागात जाऊन सेल्फी काढताना पाय घसरून तो दरीत कोसळा. गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला, असे लोणावळा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Census 2027 teacher safety concerns
Sambhajiraje Chhatrapati
Gopalgad Fort; uday samant
Top-10-News
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com