Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil news : गोकुळच्या निकालादिवशी बिनआवाजाचा बाँब फुटणार; सतेज पाटलांकडून मोठ्या बदलाचे संकेत

Gokul Dairy Election, Mahayuti, Kolhapur Politics : आमचे सर्वसामान्य आणि दूध उत्पादकांच्या हिताचे पॅनेल आहे. त्यामुळे दूध उत्पादक ठरावदार स्वत:च्या गाडीने येऊन आम्हाला मतदान करतील, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

Rahul Gadkar

Gokul Election 2026 update : ‘गोकुळ’ निवडणुकीनिमित्त महायुतीमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कलहाचा विस्फ़ोट महायुतीच्या रविवाराच्या बैठकीत झाला. त्यामुळे सहा महिन्यापूर्वी सुरु झालेल्या वादाला पुन्हा एकदा फोडणी मिळाली. त्यावर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी भाष्य केले आहे.

महायुतीला पाठिंबा देण्यावरून बोलताना गोकुळ निवडणुकीत महायुतीसोबत जाणे म्हणजे आत्महत्या केल्यासारखे आहे, हे सभासदांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ठरावाचे कोणी कितीही दावे केले तरी सभासद समविचारी आघाडीसोबतच राहून निकालादिवशी बिनआवाजाचा बाँब फुटणार, असे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.

आमदार पाटील म्हणाले, महायुतीतील सत्ता मिळवण्यासाठी सुरू असलेला राडा सहा महिन्यांपासून आहे. दूध उत्पादकही तो उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. कॉलर धरणे, महापालिकेच्या चौकात शड्डू मारण्यापासून जिल्हा परिषदेचा निधी आमदारांना देण्यापर्यंत यांचा सुसंवाद सुरू आहे.

‘गोकुळ’ निवडणुकीत टोकणची भाषा महायुतीकडून सुरू आहे, आमच्याकडून नाही. आमचे सर्वसामान्य आणि दूध उत्पादकांच्या हिताचे पॅनेल आहे. त्यामुळे दूध उत्पादक ठरावदार स्वत:च्या गाडीने येऊन आम्हाला मतदान करतील, असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला आहे.

पाटील-डोंगळेंना शोधावे लागणार

विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्या राजकीय भूमिकेवर पाटील म्हणाले, ‘मागील पॅनेलमध्ये मी आणि मुश्रीफ बसलो की, विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे उजवीकडे व डावीकडे बसायचे. आता त्यांना शोधावे लागेल, अशी त्यांची अवस्था झाली आहे.’

सरसकट कर्जमाफीसाठी विशेष अधिवेशन घ्यावे

पंचनामे करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात पाचशे रुपये मागितले जात आहेत. उद्या दुष्काळाचे अनुदान मिळण्यासाठीही पैसे मागितले जातील. भ्रष्टाचार कुठपर्यंत पोहोचला आहे, हे या प्रकारातून स्पष्ट होते. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, यासाठी विशेष अधिवेशन घेतले पाहिजे, अशी मागणी पाटील यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT