Rahul Gandhi Congress : आपण विजयाच्या अगदी जवळ होतो, मग काय झालं? दारुण पराभवांतर राहुल गांधींचा थेट नेत्याला सवाल

NSUI, DUSU Elections, ABVP Victory, Kanhaiya Kumar : उमेदवारांची निवड, तिकीट वाटप, प्रचार आदी मुद्द्यांवर राहुल यांनी नेत्यांना धारेवर धरल्याचे वृत्त आहे. तिकीट न मिळाल्याने काही इच्छुकांनी बंडाची भूमिका घेतली होती.
Rahul Gandhi statement on Congress election loss
Rahul Gandhi questions Congress leader after defeatSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi University Election update : दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यार्थी संघटन असलेल्या NSUIचा दारूण पराभव झाला आहे. या निवडणुकीत महत्वाच्या चार पदांपैकी एनएसयूआला एकही पद मिळाले नाही. पक्षावर ओढविलेल्या या नामुष्कीनंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा गंभीरपणे घेत नेत्यांचे कान उपटले आहेत.

राहुल गांधी यांनी सोमवारी एनएसयूआय आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेत निवडणूक निकालांवर कानउघाडणी केल्याचे समजते. बैठकीत एनएसयूआयचे प्रभारी कन्हैया कुमार, अध्यक्ष विनोद जाखड आणि काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल उपस्थित होते. यादरम्यान राहुल यांनी आपण विजयाच्या अगदी जवळ होतो, मग काय झालं? असा थेट सवाल कन्हैया कुमार यांना विचारला.

उमेदवारांची निवड, तिकीट वाटप, प्रचार आदी मुद्द्यांवर राहुल यांनी नेत्यांना धारेवर धरल्याचे वृत्त आहे. तिकीट न मिळाल्याने काही इच्छुकांनी बंडाची भूमिका घेतली होती. त्यामध्ये दीपांशू शौकीन हे नाव चर्चेत होते.

त्यांनी तिकीट न मिळाल्याने अपक्ष निवडणूक लढवत उपाध्यक्षपदी दणदणीत विजय मिळविला. विशेष म्हणजे एनएसयूआयचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यामुळे उमेदवारांच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Rahul Gandhi statement on Congress election loss
S Chokalingam : आधी दोन आयुक्त, आता महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचेही थेट आयोगाला पत्र; कशावर घेतलाय आक्षेप?

राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसकडून विद्यार्थी, तरुणांना पक्षाकडे अधिक आकर्षित करण्यासाठी मागील काही महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. खुद्द राहुल हे देशात ठिकठिकाणी छात्रों की गुंज हा कार्यक्रम घेत आहेत. त्यातून विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत आहेत. असे असताना दिल्ली विद्यापीठात झालेल्या परभवाने पक्षाच्या रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उभी केली जाऊ लागली आहेत.

Rahul Gandhi statement on Congress election loss
SC to OBC demand : आम्हाला अनुसूचित जातीत राहायचं नाही, OBC मध्ये समावेश करा! 'या' समाजाने केली धक्कादायक मागणी

दरम्यान, विद्यापीठाच्या निवडणुकीत एबीव्हीपीने तीन जागांवर विजय मिळविला आहे. अध्यक्षपदाची निवडणूक अखेरच्या काही फेऱ्यांपर्यंत अत्यंत चुरशीची झाली होती. एनएसयूआयचा उमेदवार बहुतेक फेऱ्यांमध्ये आघाडीवर होता. मात्र, अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये एबीव्हीपीच्या उमेदवाराला अधिक मते मिळाली. एनएसयूआयकडून या दरम्यान मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com