HIGH Court Election Commission : आयोग पक्षाच्या सल्ल्यानुसार वागला असेल तर मग काय उरले! निवडणूक चिन्हावरून कोर्टाकडून कानउघाडणी

Election Commission of India, ECI, West Bengal bypoll, Nandigram by-election : नंदीग्राम सेक्युलर फ्रंट आणि डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेस हे दोन्ही पक्ष नंदीग्रामच्या निवडणुकीत उतरले आहेत. आता फ्रंटला कपाट तर डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेसला लिफाफा चिन्ह दिले आहे.
Election Commission of India
Election Commission of IndiaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Election symbol case : विरोधी पक्षांकडून केंद्रीय निवडणूक आयोगावर पक्षपातीपणाचे आरोप केले जात असतानाच कोलकाता हायकोर्टानेही एका प्रकरणात चांगलीच कानउघाडणी केली आहे. निवडणूक आयोग खाजगी पक्षाच्या सल्ल्यानुसार वागत असेल तर मग काय उरले?, अशी टिप्पणी करत कोर्टाने आयोगाच्या कार्यपध्दतीवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?

पश्चिम बंगालमध्ये नंदीग्राम आणि रेजीनगर विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी ६ ऑक्टोबर रोजी मतदान आहे. या निवडणुकीसाठी आयोगाने डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेस या नव्या पक्षाला लिफाफा हे निवडणूक चिन्ह बहाल केले आहे. त्याविरोधात इंडियन सेक्युलर फ्रंट या पक्षाने हायकोर्टात याचिका दाखल केली होती. हे चिन्ह आधी आपल्याला देण्यात आले होते, असा दावा याचिकेत करण्यात आला होता.

याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टाने निवडणूक आयोगावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. न्यायमूर्ती कृष्णा राव यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सोमवारी सुनावणी झाली. मात्र, त्यापूर्वी कोर्टाने आयोगाच्या भूमिकेवर आक्षेप नोंदविले. चिन्ह देताना आयोग आणि नव्या पक्षामध्ये संगनमत होते का, असा सवाल कोर्टाने केला.

Election Commission of India
S Chokalingam : आधी दोन आयुक्त, आता महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांचेही थेट आयोगाला पत्र; कशावर घेतलाय आक्षेप?

कोर्टामध्ये संविधानिक अधिकारी आणि संस्थांनी निष्पक्ष असायला हवे. वर्तनातून संगनमत दिसून येत आहे.हे सांगण्याची माझी इच्छा नाही, पण जर निवडणूक आयोग खाजगी पक्षाच्या सल्ल्यानुसार वागला असेल, तर मग काय उरले?, अशी टिप्पणी कोर्टाने केली. कोर्टाने आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना म्हटले की, याचिकाकर्त्याने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लिफाफा चिन्हावर लढविली होती. आता ते पुन्हा पोटनिवडणूक लढवू इच्छित आहे. पण लिफाफा हे चिन्ह आता अशा पक्षाला देण्यात आले जो पक्ष अस्तित्वातही नव्हता.

एखाद्या चिन्हावर कोणत्याही पक्षाचा कायमस्वरुपी अधिकार नसला तरी जेव्हा एकाच चिन्हासाठी दोन अर्ज येतात, तेव्हा आयोगाचे कर्तव्य काय असते? आयोगाने कोणत्या तरतुदीनुसार हे चिन्ह दुसऱ्या पक्षाला दिले? याचिकाकर्त्याचा अर्ज फेटाळून लावण्याचे लिखित कारण आयोगाने का दिले नाही, असे प्रश्नही कोर्टाने उपस्थित केले.

Election Commission of India
Rahul Gandhi Congress : आपण विजयाच्या अगदी जवळ होतो, मग काय झालं? दारुण पराभवांतर राहुल गांधींचा थेट नेत्याला सवाल

दरम्यान, नंदीग्राम सेक्युलर फ्रंट आणि डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेस हे दोन्ही पक्ष नंदीग्रामच्या निवडणुकीत उतरले आहेत. आता फ्रंटला कपाट हे चिन्ह देण्यात आले आहे. तृणमूल काँग्रेसमधून बंड केलेल्या आमदारांच्या गटाला निवडणूक आयोगाने डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेस हे नाव दिले आहे. आता त्यांना निवडणुकीसाठी लिफाफा चिन्ह दिले आहे. मुळ तृणमूल काँग्रेस पक्ष आणि चिन्हाची लढाई सध्या निवडणूक आयोगासमोर सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com