kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात सध्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गोकुळचा बाप हा विश्वास पाटील आहे, असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. चौफेर टीका झाल्यानंतर अरुण डोंगळे यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले. पण आता काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी या वक्तव्याचा स्टेटस ठेवून समाचार घेतला आहे.
गोकुळ दूध संघाचा खरा बाप हा मायबाप शेतकरीच आहे, असं सांगत त्यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी याबाबत एक परिपत्रक आपल्या व्हाट्सअप स्टेटसला ठेवले आहे.कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या होवू घातलेल्या निवडणुकीसाठी तुमच्या दूध संस्थेचा ठराव तुमच्या नावावर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! गोकुळचे शिल्पकार कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांनी गोकुळ दूध संघाला प्रगतीपथावर नेले. गोकुळने जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर १० दिवसाला ८० कोटी रुपयाचे दुधाचे बिल देवून खऱ्या अर्थाने अर्थक्रांती घडवून आणली आहे.
गोकुळच्या गेल्या निवडणुकीमध्ये दुधाला २ रुपये जादा दर देण्याचा शब्द मी दिला होता. या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षात म्हैशीच्या दुधाला १४ रुपये आणि गायीच्या दुधाला १० रुपये प्रति लिटर दरवाढ देवून हा शब्द पाळला आहे. त्याबरोबरच गोकुळ दूध संघ, संघाशी संलग्न दूध संस्था, दूध उत्पादक शेतकरी यांच्या हिताचा कारभार माझ्या नेतृत्वाखाली झाल्याचे समाधान आहे.
गोकुळच्या प्रगतीमध्ये दूध उत्पादक शेतकरी आणि माता-भगिनी यांचा मोठा वाटा आहे. शेतकरी आणि माता-भगिनी यांनी पहाटेपासून घाम गाळून, शेणा-मुतात हात घालून केलेल्या कष्टामुळेच गोकुळ नावारुपाला आला आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे खरे बाप आहेत. दूध उत्पादकांचा सन्मान, दुधाला जास्तीत-जास्त दर मिळवून देणे, गोकुळ दूध संघ टिकविणे हाच माझा प्रयत्न आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये गट-तट तसेच पक्ष बाजूला ठेवून आपण राजर्षि शाहू शेतकरी समविचारी आघाडीला सहकार्य आणि आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती मी आपणांस करत आहे.
गोकुळच्या विकासाची जबाबदारी मी तसेच आमच्या समविचारी आघाडीचे उमेदवार निश्चितपणे पार पाडू, अशी ग्वाही या निमित्ताने देतो. तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून गोकुळ टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कटिबध्द राहूया. धन्यवाद !
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.