गोकुळ दूध संघाच्या राजकारणावर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली
प्रशासक नेमल्यानंतरच काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले
गोकुळच्या सभासदांचा निर्णय आपल्या बाजूनेच येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
kolhapur gokul politics : गोकुळ दूध संघावरून सूरू असलेल्या राजकारणावरून महायुतीमध्ये आमदार सतेज पाटील यांनी पहिल्यांदाच विधान केले. मात्र महायुतीमध्ये सुरू असलेल्या राजकारणावर आणि प्रशासक नेमल्यानंतरच आपली भूमिका स्पष्ट करू अशी प्रतिक्रिया काँग्रेसने आमदार सतेज पाटील यांनी दिले आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांवर प्रशासक असा नवा कायदा झाला आहे. गोकुळच्या १२०० संस्थांवर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. आता हे सगळं शासनाच्या हातात आहे. शासन काय निर्णय घेते ते आम्ही पाहणार आहोत. ५ तारखे नंतर या संदर्भातली आपली भूमिका जाहीर करू.
आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे काही माहिती असेल त्या आधारे ते बोलत आहेत. त्यांच्यासोबत बसून कोणीतरी चर्चा केली पाहिजे. डोंगळे व पाटील यांच्याबाबत ईडीची मागणी करण्याएवढं तुमच्याकडे काय आहे. याबद्दल त्यांच्यासोबत चर्चा केली पाहिजे, असे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
शेतकऱ्याला दोन रुपये दरवाढ देण्याचं ठरवून आपण गोकुळ निवडणूक लढवली होती. मात्र प्रत्यक्षात अठरा रुपयांची दूध दरवाढ आम्ही दिली आहे. महायुती म्हणून लढणार असं त्यांनी जाहीर केल आहे. मी आमच्या समविचारी लोकांना घेऊन गोकुळची निवडणूक लढवणार आहे. आजपर्यंत आम्ही गोकुळ आणि जिल्हा बँकेत राजकीय जोडे बाहेर ठेवले आहेत. आता ते समोरून पक्ष म्हणून येणार असतील तर आम्ही देखील ते करू. कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. निवडणुकी वेळी गोकुळचा सभासद योग्य निर्णय घेईल. सभासदांचा निर्णय आमच्या बाजूनेच असेल, असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.
गोकुळमध्ये महायुतीच पॅनेल असेल असं हसन मुश्रीफ यांनी गेल्या सहा महिन्यात बारा हजार वेळा बोलले आहेत. मुश्रीफ यांनी महायुतीचा इतका ध्यास घेतला आहे की, 'आपणच महायुतीचे शिल्पकार आहोत' असं ते वागत आहेत, असा टोलाही सतेज पाटील यांनी लगावला.
काँग्रेसची माघारीची हॅट्रिक झाली म्हणणे हे उतावळेपणाचे ठरेल. या सगळ्या बाबतीत महाराष्ट्र आणि देशाच्या कॅनवासचा विचार केला पाहिजे. काल आम्ही दोन-तीन तास बसून शिवसेनेशी बोललो. या पुढच्या निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्टपणे मांडतो, असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
1. सतेज पाटील यांनी गोकुळ प्रकरणावर काय म्हटले आहे
प्रशासक नेमल्यानंतर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल असे त्यांनी सांगितले
2. काँग्रेसची भूमिका काय आहे
सध्या काँग्रेस थेट भूमिका न घेता योग्य वेळेची वाट पाहत आहे
3. गोकुळ निवडणुकीत काँग्रेस सहभागी होणार का
त्याबाबत स्पष्ट भूमिका प्रशासक नियुक्तीनंतरच जाहीर होईल
4. सतेज पाटील यांनी सभासदांबद्दल काय म्हटले
सभासद सुज्ञ असून योग्य निर्णय घेतील आणि तो काँग्रेसच्या बाजूने असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
5. या वादाचा पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो
गोकुळ निवडणुकीत महायुती आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता आहेFAQs (Marathi)
1. सतेज पाटील यांनी गोकुळ प्रकरणावर काय म्हटले आहे
प्रशासक नेमल्यानंतर काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करेल असे त्यांनी सांगितले
2. काँग्रेसची भूमिका काय आहे
सध्या काँग्रेस थेट भूमिका न घेता योग्य वेळेची वाट पाहत आहे
3. गोकुळ निवडणुकीत काँग्रेस सहभागी होणार का
त्याबाबत स्पष्ट भूमिका प्रशासक नियुक्तीनंतरच जाहीर होईल
4. सतेज पाटील यांनी सभासदांबद्दल काय म्हटले
सभासद सुज्ञ असून योग्य निर्णय घेतील आणि तो काँग्रेसच्या बाजूने असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला
5. या वादाचा पुढील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो
गोकुळ निवडणुकीत महायुती आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता आहे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.