Hasan Mushrif-Dhananjay Mahadik-chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Election : ‘गोकुळ’च्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? एकटे मुश्रीफ मातब्बर महाडिकांसह अबिटकर, मंडलिक, नरकेंचे टेन्शन वाढवणार

Kolhapur political tension, Gokul election update : महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने जागावाटप झाले. ही पद्धत जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघामध्ये लागू शकणार नाही.

Rahul Gadkar

Maharashtra dairy election : गोकुळ दूध संघाच्या यंदा होणाऱ्या निवडणुकीमध्ये 5 हजार 470 इतकी सभासद संख्या आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत 1200 नव्या सभासदांची वाढ झाल्याने सर्वच राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तब्बल प्रत्येकी 150 मतांची जोडणी केल्याशिवाय कोणत्याही पॅनेलला गुलाल लागणार नाही. त्यामुळे विजय मिळवायचा झाल्यास महायुती किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना तब्बल 2800 मतांचा आकडा गाठावा लागणार आहे.

यंदा पंचवीस संचालक असल्याने सर्वांकडे 140 पेक्षा अधिक ठराव असले तरच सर्व पॅनेल विजयापर्यंत जाणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय खेळी करत महायुतीच्या नेत्यांना कोंडीत पकडले आहे. प्रत्येक 150 ठरावामागे जागावाटपाचा फॉर्म्युला असा प्रस्ताव ठेवल्याचे सांगितले जाते.

महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने जागावाटप झाले. ही पद्धत जिल्हा बँक आणि गोकुळ दूध संघामध्ये लागू शकणार नाही. महायुतीमधील नेत्यांचा सुरुवातीपासूनच मंत्री मुश्रीफ यांच्यावर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने दबाव वाढला आहे. अशा परिस्थितीत सर्वांनाच समान जागा वाटप होण्यासाठी एका नेत्याने मुंबई पातळीवरून प्रयत्न सुरू केले आहेत. गोकुळची निवडणूक ही मतदारांवर नाही तर ठरावावर अवलंबून असल्याने ज्याच्याकडे अधिक ठराव आहेत. त्यालाच जागा वाटपामध्ये अधिक जागा मिळाव्यात, यासाठी मंत्री मुश्रीफ यांचे प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगितले जाते.

मुश्रीफ यांनी, ज्यांच्याकडे जितके ठराव आहेत. त्या प्रत्येक ठरवामागे १५० उमेदवारी अशी अट घातली आहे. व ज्यांच्याकडे ठराव जास्त त्यांनाच उमेदवारी, असा फॉर्म्युला त्यांनी निश्चित केला आहे. तसें जागावाटप करण्यावर महायुतीमधील नेत्यांच्या चर्चा सुरु आहे. महायुतीच्या सर्वच नेत्यांनी हा प्रस्ताव मान्य केला तर मंत्री मुश्रीफ हेच सर्वाधिक जागेवर आपले उमेदवार देऊ शकतात. कारण मागील पाच वर्षात जे वाढीव सभासद आहेत. त्यामध्ये मंत्री मुश्रीफ यांचे ठराव अधिक आहेत.

सत्तारुढ गटाने मागच्या पाच वर्षांत सुमारे १२०० नवीन मतदार केले आहेत व ते पात्र ठरले आहेत. त्याची विभागणी होईल परंतु ही ताकदही महत्त्वाची आहे. जागावाटप होताना कुणाकडे किती ठराव आहेत त्यावरूनच त्या पक्षाला तेवढ्या जागा दिल्या जातील, अशा घडामोडी सुरू आहेत. महायुती म्हणून तीन पक्षांना सरसकट स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे जागा वाटप न करता त्याला ठरावांची संख्या जोडण्याचा राष्ट्रवादीचा यांचा प्रयत्न आहे. संचालकांनी आतापासूनच आपापल्या ठराव धारकांशी संपर्क साधून ठराव गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, मंत्री मुश्रीफ यांनी समोर ठेवलेली अट पाहता, महाडिक, नरके, मंडलिक, आणि आबिटकर गटाला त्याचा फटका बसू शकतो. कारण गेल्या पंचवीस वर्षापासून सत्ता असलेल्या महाडिक गटाला मंत्री मुश्रीफ आणि आमदार पाटील गटाने धक्का दिला. त्यामुळे आता महायुती म्हणून लढत असताना भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीला समान जागा मिळाव्या यासाठी प्रयत्न सुरू आहे. येत्या आठ दिवसात त्याबाबत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT