Rajya Sabha Election : संसदेत इतिहास घडणार; राज्यसभेत निवडून जाणार पहिला समलिंगी खासदार, 'या' महिलेला उमेदवारी जाहीर...

Menaka Guruswamy TMC Candidate : मेनका गुरुस्वामी यांच्यामुळे २०१८ मध्ये भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ रद्द करण्यात आले होते. त्यानंतरच भारतात समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढण्यात आले होते.
Menaka Guruswamy
Menaka GuruswamySarkarnama
Published on
Updated on

Indian politics : भारतीय संसदेत लवकरच इतिहास घडणार आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणुकीत एक समलिंगी महिला वकील आपले नशीब आजमावणार आहेत. त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकताच बाकी असल्याने लवकरच संसदेत देशातील पहिल्या समलिंगी खासदार दिसतील. त्यांच्यारूपाने पहिल्यांदाच LGBTQ समुदायाला संसदेत प्रतिनिधित्व मिळणार आहे.

मेनका गुरूस्वामी असे त्यांचे नाव आहे. तृणमूल काँग्रेसने त्यांना १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्यासोबत प्रसिध्द गायक बाबुल सुप्रियो, बंगालचे माजी पोलीस महासंचालक राजीव कुमार आणि अभिनेत्री कोयल मल्लिक यांनाही उमेदवारी जाहीर झाली आहे.

कोण आहेत मेनका गुरुस्वामी?

पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेसचे बहुमत असून मेनका यांच्यासह चारही उमेदवार सहजपणे निवडून येतील, एवढे संख्याबळ आहे. त्यामुळे मेनका यांची निवड निश्चित मानली जात आहे. त्या सुप्रीम कोर्टातील वरिष्ठ विधिज्ञ म्हणून ओळखल्या जातात. समलैंगितेशी संबंधित एका ऐतिहासिक केसमध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात बाजू लढविली होती.

Menaka Guruswamy
एकमेव महिला आरोपी, 5 महिने तुरुंगात... पक्ष गेला, आमदारकीही पणाला...

मेनका गुरुस्वामी यांच्यामुळे २०१८ मध्ये भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ रद्द करण्यात आले होते. त्यानंतरच भारतात समलैंगिकतेला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढण्यात आले होते. मेनका यांनी १९९७ मध्ये भारताची माजी अटर्नी जनरल अशोक देसाई यांच्यासोबत काम करण्यास सुरूवात केली. देसाई यांनाच त्या आपल्या गुरू मानतात.

मेनका यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून विधी शाखेची पदवी तर हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळविली आहे. काही काळ त्यांनी न्यूयॉर्कमध्ये काम केले. ऑक्सफोर्ड विद्यापीठातील रोड्स हाऊसमधील मिलनर हॉलमध्ये त्यांचे पोट्रेट लावण्यात आले आहे. असा सन्मान मिळविणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आणि जगातील दुसऱ्या महिला आहेत.

Menaka Guruswamy
Parth Pawar : राज्यसभेसाठी पार्थ पवारांची उमेदवारी जाहीर, पण नेमकी निवडणूक कोणती? पटेलांनी एक सांगितलं अन् मुंडेंनी दुसरंच...

मेनका यांनी भारतात परतल्यानंतर नवी दिल्लीत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर त्यांनी अनेक महत्वाच्या केस लढवत लक्ष वेधून घेतले. टाईम्स मॅगझीनच्या २०१९ च्या सर्वाधिक प्रभावशाली १०० लोकांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला होता.        

तृणमूलशी कनेक्शन

तृणमूल काँग्रेसच्या प्रचार-प्रसिध्दीसह निवडणुकांचे नियोजन करणाऱ्या आय-पॅक या संस्थेवर ईडीने नुकतीच धाड टाकली होती. याप्रकरणी टीएमसीने कोर्टात आव्हान दिल्यानंतर मेनका यांनीच ती केस लढविली होती. त्यानंतर काही दिवसांतच मेनका यांनी टीएमसीने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत त्या विजयी झाल्यास इतिहास घडणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com