Kolhapur News : पदवीधर व शिक्षक विधानपरिषद मतदारसंघांसाठी नव्याने मतदारयाद्या तयार करण्याचा सुधारित कार्यक्रम घोषित केलेला आहे. त्यानुसार 3 डिसेंबरला प्रारुप मतदारयादी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सन 2020 मधील निवडणुकीवेळी पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी निश्चित करण्यात आलेल्या सर्व मतदान केंद्रांवर दर्शनी भागात प्रसिध्द करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 3 ते 18 डिसेंबर असेल.
निवडणुकीसाठी नाव नोंदणी केलेल्या सर्व मतदारांनी प्रारुप मतदारयादीची माहिती करुन त्यांचे नाव व नावातील इतर तपशिलाबाबत खातरजमा करावी. नाव व इतर तपशिलात दुरुस्ती असल्यास त्याबाबत नमुना 8 भरुन आवश्यक कागदपत्रांसह संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावा. एखाद्या नावाबाबत दावे व हरकती दाखल करावयाची असल्यास त्याबाबत नमुना 7 चा वापर करावा, असे आवाहन निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.
प्राप्त दावे किंवा हरकतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (सर्व विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी ACERO) यांचे कार्यालयात सुनावणीअंती हरकतदार, ज्यांच्या नावाबाबत हरकत घेण्यात आली आहे, ती व्यक्ती अशा सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेवून व सादर केलेले पुरावे विचारात घेवून अंतिम निर्णय घेण्यात येईल.
नमुना - 7 व नमुना -8 चे कोरे फॉर्म्स जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर kolhapur.gov.in व निवडणूक शाखेमध्ये तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
प्राप्त दावे व हरकती 5 जानेवारी 2026 पर्यंत निकाली काढून 12 जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी पुन्हा प्रसिध्द करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी गीता गायकवाड यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.