PN Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

P.N Patil : मान, अपमान, संघर्षातही काँग्रेससोबत राहिले पी.एन. पाटील; पण मुलाच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे निष्ठावंतचा शिक्का पुसला जाणार?

Rahul Patil NCP Entry : एका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेकांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता अधिक भेडसावते. त्यामध्ये विरोधी पक्षातील असला तर राजकीय अस्तित्व संपण्याची भीती अनेकांना वाटते. त्यामुळे सत्तेसोबत राहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.

Rahul Gadkar

Kolhapur News, 14 Aug : एका निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेकांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता अधिक भेडसावते. त्यामध्ये विरोधी पक्षातील असला तर राजकीय अस्तित्व संपण्याची भीती अनेकांना वाटते. त्यामुळे सत्तेसोबत राहण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. ज्या व्यक्तीला खुर्चीची उब असते. ती व्यक्ती सत्तेच्या खुर्ची शिवाय दुसरे काहीच बघत नाही.

याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. सध्या त्याचाच प्रत्यय महायुतीतील अनेकांच्या पक्षप्रवेशावरून येत आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघाची दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांची काँग्रेसवर असलेली निष्ठा याला अपवाद आहे. मात्र त्यांचे पुत्र त्या 25 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत. त्यानिमित्ताने निष्ठावंत पी.एन. पाटील? यांचे अनेक किस्से चौकाचौकात रंगले जाऊ लागले आहेत.

काँग्रेसचे नेते दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली. पण निसटत्या मतांनी त्यांचा पराभव झाला. मात्र निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 25 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राहुल पाटील यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे.

अनेकांनी या पक्षप्रवेशाला थेट विरोध केला आहे. तर राहुल पाटील जी भूमिका घेतील त्यांच्यासोबत आम्ही राहू अशीही भूमिका आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे. पण यानिमित्तानेदिवंगत नेते आमदार पीएन पाटील यांच्या काँग्रेस बद्दलच्या निष्ठेची चर्चा सध्या करवीर सह जिल्ह्यात सुरू आहे. पी.एन. पाटलांचे गांधी घराण्यावर प्रचंड प्रेम होते. खास करून राजीव गांधी यांच्यावर निष्ठा होती.

राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांनी देशातील पहिली सद्भावना दौड सुरू केली ती आजही कायम आहे. त्यांच्या जयंती दिवशी कोल्हापूर ते पुरली येथील राजीव गांधी सूत गिरणी येथे ही सद्भावना दौड निघते. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील पहिला राजीव गांधी यांचा पुतळा कोल्हापुरात उभा केला. लोक आजही गमतीने असे म्हणत की एक वेळ राहुल गांधी सोनिया गांधी काँग्रेस पक्ष सोडतील. पण पी.एन. पाटील कधीही पक्ष सोडणार नाहीत ही अपार निष्ठा काँग्रेस बाबतीत होती.

जवळपास पूर्वीचा सांगरूळ आणि आताचा करवीर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत दिवंगत आमदार पी एन पाटील यांनी सहा निवडणुक लढवल्या. त्यापैकी चार निवडणूक ते पराभव झाले, पण पराभवानंतरही त्यांनी कधी काँग्रेस सोडण्याचा विचार केला नाही. पक्षातील अनेक जवळच्या मंडळींनी त्यांना धोका दिला. त्याचा प्रत्यय वारंवार आला. 2019 ला मंत्री पदाने हुलकावणी दिली. त्याला त्यांचेच सहकारी आडवे आल्याचे सांगितले जाते.

2004 च्या विधानसभा निवडणुकीत सांगरूळ विधानसभा मतदारसंघात अरुण डोंगळे आणि पी.एन. पाटील यांनी काँग्रेसकडे उमेदवारीसाठी धावा केला होता. मात्र डोंगळे यांनी काँग्रेसची उमेदवारी खेचून आणली. पक्षाने पी. एन पाटील यांना डावलले होते. मात्र तरीही त्यांनी धीर सोडला नाही. अवघ्या तासाभरात सूत्रे हलवून काँग्रेसकडून उमेदवारी खेचून आणली. मात्र पक्षाने डावलल्याची सल त्यांच्या मनात असली तरी त्याबाबत कोणताही दोष मनात ठेवला नाही.

पक्षाने इतके डावलून सुद्धा त्यांनी कधी पक्ष सोडला नाही. काँग्रेस पक्षच त्याचे ध्येयधोरण. काँग्रेसच्या विचारांशी कोणतीही तडतोड करणार नाही असं ध्येयच पी.एन. पाटील यांचे होते. आजच्या जमान्यात नेतृत्वावर डोळे झाक पणे विश्वास ठेवणार नेतृत्व हे क्वचितच महाराष्ट्रात होते. हे कोणाला पटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांना एकमेकांचे भाऊ समजले जात होते.

विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसमधील त्यांचा गॉडफादर गेला. त्यानंतर पक्षाकडून त्यांना नेहमीच दुर्लक्षित करण्यात आले. तरीदेखील त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यानंतर त्यांच्याकडे पक्षाने फारसे लक्ष दिले गेले नाही. जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हा अध्यक्षांचे पद देखील त्यांच्याकडे राहिले नाही. त्या ठिकाणी माजी आमदार प्रकाश आवाडे हे जिल्ह्याध्यक्ष राहिले. पण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद सोडून प्रकाश आवाडे भाजपकडे गेले.

तरी देखील पी.एन. पाटील हे काँग्रेसमध्येच राहिले. शेवटी काँग्रेस मधूनच आमदार झाले आणि काँग्रेसमध्ये असतानाच आमदार म्हणून अखेरचा श्वास घेतला. पण सध्या पुत्र राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे पी.एन. पाटील यांनी काँग्रेसचे निष्ठावंत राहून काय संदेश निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिला याची चर्चा सध्या करवीरच्या गाव चावडीवर रंगू लागली आहे. गेली 30 वर्ष निष्ठावंत म्हणून काँग्रेसची मोहर पाटील यांच्या गटावरून उमटली आहे. अखेर तो निष्ठावंतचा शिक्का पुसला जाणत याची खंत आजही करवीरच्या निस्सिम काँग्रेस कार्यकर्त्याला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT