Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते लखन बेनाडे यांच्या पत्नीनेच त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. तब्बल 8 लाख रुपये हडप करून, घरातील दागिने घेऊन पत्नीने प्रियकरासोबत पळ काढला आहे. याबाबत लखन बेनाडे यांनी पत्नी विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
शिवाय पत्नीला परत न्यायचं असेल तर 3 लाख रुपये दे अशी मागणी प्रियकरनेच केल्याचेही बेनाडे यांनी तक्रारीत सांगितले आहे. फिर्याद दिल्याचे कळताच पत्नीने पोलीस स्टेशनच्या बाहेरून व्हिडिओ करत नवर्याला धमकावल्याचे सांगितले जाते. बेनाडे यांच्या तक्रारीनंतर पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील रांगोळी या गावातील ग्रामपंचायत सदस्य म्हणून लखन बेनाडे गेली 2 वर्ष काम करत आहे. 2023 मध्ये बेनाडे यांची लक्ष्मी लोंढे या महिलेसोबत ओळख झाली. मात्र लक्ष्मी लोंढे हिचे विशाल गस्ते या व्यक्तीबरोबर प्रेम संबंध होते. रण विशाल आणि लक्ष्मी या दोघांमध्ये भांडण झाले आणि लक्ष्मीने विशालपासून सोटका व्हावी यासाठी लखन बेनाडे यांच्यासोबत संपर्क वाढवला.
त्यानंतर बेनाडे यांच्याशी लग्न करण्याचा बनाव केला. 2024 मध्ये लखन बेनाडे आणि लक्ष्मी लोंढे यांचा विवाह झाला. लग्न होताच लक्ष्मीने पुन्हा विशाल गस्तेच्या मदतीने लखन बेनाडे यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. नातेवाईकांचे निमित्त करून लक्ष्मीने लखनकडून 8 लाखांहून अधिकची रक्कम हडप केली. लखन बेनाडे यांच्याकडील सर्व पैसे संपलेले आहेत हे लक्षात येताच लक्ष्मीने सर्व दागिने आणि रोख रक्कम घेऊन लखन यांना सोडून विशाल गस्ते सोबत पुन्हा पळून गेली.
दरम्यान, लक्ष्मी यांना आणायला गेलेल्या बेनाडे यांना गस्ते यांनी पुन्हा मारहाण केली. तुला जर तुझी पत्नी पुन्हा हवी असेल तर 3 लाख रुपये रोख दे अशी धमकी विशाल गस्तेने लखन बेनाडे यांना दिली. लक्ष्मी प्रियकरासोबत पुन्हा पळून जाऊन तिने आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच लखन बेनाडे यांनी कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत शाहूपुरी पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे.
या संपूर्ण प्रकारानंतर आपली बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर लक्ष्मीने थेट पोलीस स्टेशनच्या बाहेरूनच पती लखन बेनाडे यांना इंस्टाग्राम वरून आव्हान देण्याच्या प्रयत्न केला आहे.
मंत्र्यांच्या जवळचा कार्यकर्ता :
लखन बेनाडे हा राष्ट्रवादीचा युवा कार्यकर्ता आहे. सुरुवातीला त्याची राष्ट्रवादीतील प्रमुख नेत्यांची तोंडओळख होती. पण काही वर्षांपूर्वी एका नेत्यांवर इडी कारवाई होत असताना याच बेनाडे यांनी उंच इमारतीवर जाऊन केंद्र सरकारचा निषेध केला होता. तेव्हापासून बेनाडे हा विद्यमान मंत्र्यांच्या जवळचा कार्यकर्ता बनला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.