Shahu Maharaj : Nana Patole Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Lok Sabha Election 2024 : ठरलं! शाहू महाराजांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; कोणत्या चिन्हावर लढणार?

Chetan Zadpe

Kolhapur News : तोंडावर आलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघात करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून पक्कं झाल्याची माहिती आहे. याचे संकेत खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. शाहू महाराजांसाठी आम्ही ही जागा राखून ठेवली आहे. मात्र ते कोणत्या चिन्हावर लढतील याचा हे तूर्त आता तरी सांगता येणार नाही. आमच्याकडे मशाल, हात, तुतारी असे तिन्ही पर्याय आहे, असे पटोलेंनी सांगितले. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शरद पवारांचे सूचक वक्तव्य -

शरद पवार (Sharad Pawar) काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात म्हणाले की, "शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मित्रपक्षांच्या सहकाऱ्यांशी आणि माझ्याही सहकाऱ्यांशी चर्चा केली नाही. मला व्यक्तिगत विचाराल तर माझ्या सहकाऱ्यांनाही या सूचनेबाबत आनंदच होईल, परंतु प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो. सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो."

शाहू महाराज काय म्हणाले?

दरम्यान, तीन दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) एका कार्यक्रमात शाहू महाराजांनीही उमेदवारीबाबत सूचक विधान केले होते. कार्यक्रमातील उपस्थितांना उद्देशून ते म्हणाले की, तुम्हाला पाहिजे असलेली 'ब्रेकिंग न्यूज' लवकरात लवकर मिळणार आहे. या सर्व घडामोडीवर शाहू महाराज हेच कोल्हापुरातून उमेदवार असतील असे सूचित होत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT