गरज असेल तोपर्यंत प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या आणि गरज संपताच त्याच्या छाताडावर बसायचे. ही भारताची संस्कृतीच नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी भाजपवर ( Bjp Marathi News ) केली आहे. तसेच, वकील हसन आणि त्याचा सहकारी मुन्ना कुरेशी यांच्या घरावर केलेल्या कारवाईचाही त्यांनी या 'एक्स' अकाउंटवद्वारे निषेध नोंदवला आहे.
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यारा येथील निर्माणाधीन बोगदा खचला होता. त्यातील कामगारांना बाहेर काढणारे हसन आणि त्याचा सहकारी मुन्ना कुरेशी यांनी घरे अनधिकृत असल्याचं कारण देत पाडण्यात आली. यावरून जितेंद आव्हाडांनी ( Jitendra Awhad ) भाजपला लक्ष्य केलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले, "उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील सिल्क्यारा येथील निर्माणाधीन बोगदा खचल्यानंतर त्या बोगद्यात अडकलेल्या 41 जणांना आपल्या मेहनतीच्या जोरावर बाहेर काढणारा वकील हसन आणि त्याचे इतर सहकारी यांची घरे आज दिल्ली विकास प्राधिकरणाने जमीनदोस्त करून टाकली. कारण पुढे केलं, अनधिकृत बांधकाम! याबाबत प्रतिक्रिया देताना त्याने सांगितले की, 'माझे घर मला द्या. मला तुमच्याकडून इतर काहीही बक्षीस नको; हे मी उघडपणाने सांगितले होते'. वकील हसन आणि त्याचा सहकारी मुन्ना कुरेशी यांनी जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला, तेव्हा त्यांनी पोलिसी अत्याचाराचाही उल्लेख करताना आपल्या मुलाबाळांना मारहाण करण्यात आली, हे उघडपणे सांगितले."
"गरज असेल तोपर्यंत प्रेमाच्या आणाभाका घ्यायच्या अन् गरज संपताच त्याच्या छाताडावर बसायचे, ही भारताची संस्कृतीच नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वकील हसन आणि मुन्ना कुरेशी यांनी जीवावर उदार होऊन अत्यंत धाडसाने 41 जणांना खचलेल्या त्या बोगद्यातून बाहेर काढले. 41 जणांचे जीव वाचवणे, ही किती मोठी गोष्ट आहे ते ज्यांचा जीव वाचला; तेच सांगू शकतील. पण, त्याबद्दल आपण त्यांना काय दिलं. तर ते बिचारे आज फूटपाथवर झोपताहेत. मला सांगा, ही भारताची संस्कृती आहे का?" असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.