Thousands of Kolhapur citizens march peacefully in protest, demanding the return of Madhuri the elephant from Reliance’s Vantara project highlighting growing public anger in Nandani. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Madhuri Elephant Protest : आता थांबायचं न्हाय, महादेवीला परत आणायचाय! कोल्हापुरकरांचा निर्धार; पहाटे 5 पासून हजारो नागरिक रस्त्यावर

Nandani Jain Math : नांदणी जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीला अंबानी यांच्या वनतारा या प्रकल्पात नेल्यापासून कोल्हापूरसह पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली आहे. माधुरी हत्तीनीला कोणत्याही परिस्थितीत परत आणण्याचा निर्धार कोल्हापूरकरांनी केला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News, 03 Aug : नांदणी जैन मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीला अंबानी यांच्या वनतारा या प्रकल्पात नेल्यापासून कोल्हापूरसह पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली आहे.

माधुरी हत्तीनीला कोणत्याही परिस्थितीत परत आणण्याचा निर्धार कोल्हापूरकरांनी केला आहे. यासाठी त्यांनी थेट अंबानीच्या रिलायन्स उद्योग समूहाच्या जिओ कार्ड बॉयकॉट केल्यानंतर नादणीकरांनी आता आपला मोर्चा आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर वळवला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राजकारण विरहित सर्वपक्षीयांचा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकत आहे. यासाठी रविवारी पहाटे पाच वाजता नांदणी येथून हा मोर्चा कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला आहे.

जवळपास 45 किलोमीटरचा प्रवास करून हा महामोर्चा सायंकाळी साडेचार वाजता कोल्हापुरातील जिल्हाधिकार्यालयावर धडकणार आहे. या पदयात्रेत हजारो नागरिक भल्या पहाटे सहभागी झाले आहेत.

दरम्यान, या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी तगडा बंदोबस्त मोर्चा मार्गावर लावला आहे. रिलायन्स उद्योग समूहातील जिओ पेट्रोल पंप यासह अनेक संस्थेशेजारी पोलिसांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त लावल्यावचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT