Tuljabhavani temple : तुळजाभवानी मंदिरातील तलवार गायब, मंत्रोपचाराने देवीची शक्ती काढल्याचा पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा

Tuljabhavani Temple Missing Sword Case : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांनी देवीची शस्त्र पूजनाची तलवार गहाळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ही तलवार मंदिर संस्थानाच्या खजाना खोलीतून गायब झाली आहे.
Tuljabhavani Temple
Priests at Tuljabhavani Temple allege the sacred sword used in Shastra Poojan is missing from the treasury. The issue has stirred major controversy in TuljapurSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News, 02 Aug : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील पुजाऱ्यांनी देवीची शस्त्र पूजनाची तलवार गहाळ झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. ही तलवार मंदिर संस्थानाच्या खजाना खोलीतून गायब झाली आहे.

तर गायब झालेली तलवार मंदिरा बाहेर असल्याचा खळबळजनक दावा पुजाऱ्यांनी केला आहे. मंत्रोपचाराने देवीच्या 8 शस्त्रातील तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून देवीची तलवार गहाळ केल्याचा आरोपही पुजाऱ्यांनी केला आहे.

पुजाऱ्यांच्या या दाव्यामुळे एकच तुळजापुरात एकच खळबळ उडाली आहे. तर तलवारी बाबत सर्व माहिती घेऊन सांगतो, असं मंदिर संस्थानने सांगितलं आहे. मात्र, एवढ्या मोठ्या मंदिरात संस्थानावर पुजाऱ्यांनी केलेल्या आरोपांमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Tuljabhavani Temple
Shivsena UBT : ठाकरेंच्या नेत्यानं उचललं टोकाचं पाऊल, 10 दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा केला अन् आता आयुष्य संपवलं

पुजाऱ्यांचा नेमका आरोप काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पद्मश्री गणेश्वर द्रविड शास्त्री यांच्याकडून पूजा करून घेत शस्त्रातील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकली आहे. तसंच होम हवन करून तुळजाभवानीची शक्ती तलवारीमध्ये काढून घेतल्याचा दावाही पुजाऱ्यांनी केला आहे.

Tuljabhavani Temple
Ladki Bahini Yojana : लाडक्या बहिणींना गुड न्यूज, सरकारकडून 'या' तारखेला मिळणार रक्षाबंधनाची भेट!

त्यामुळे गायब झालेली तलवार मंदिरात भक्तांना दर्शन घेण्यासाठी ठेवावी अशी मागणीही पुजाऱ्यांनी केली आहे. तर श्री तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला माहिती न देता मंदिर संस्थांनी हे सर्व विधी केल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणावर आणि पुजाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर मंदिर प्रशासन नेमकं काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com