Congress and NCP Sharad Pawar leaders addressing media in Kolhapur amid growing Mahavikas Aghadi rift ahead of upcoming municipal elections. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Mahavikas Aghadi: कोल्हापुरात महाविकास आघाडी फुटणार? सतेज पाटलांना अल्टिमेटम, शरद पवारांची राष्ट्रवादी बाहेर पडणार

Local Body Elections कोल्हापुरात महाविकास आघाडीमध्ये तीव्र मतभेद उफाळले असून राष्ट्रवादीनं काँग्रेसला अल्टिमेटम दिला आहे. तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता वाढली आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News: महाविकास आघाडीचा घटक पक्ष असूनही कोणत्या बैठकीसाठी आम्हाला निमंत्रण दिलं जात नाही. अशी खंत व्यक्त करत आज काँग्रेसने आमदार सतेज पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अल्टिमेटम दिला आहे. जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी इशारा देत तिसरी आघाडी स्थापन करण्यात बाबत वक्तव्य केला आहे. दरम्यान शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीला हादरे बसत आहेत. शिवाय कोल्हापुरात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आम्हालाही आनंद होईल. असे संकेत देखील या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

कोल्हापुरात महाविकास आघाडीतून आणखी एक पक्ष बाहेर पडणार असल्याची शक्यता आहे. जवळपास तिसऱ्या आघाडीचा निर्णय झाला असून उद्या सकाळी त्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. या आघाडीत वंचित आघाडी, आम आदमी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असण्याची शक्यता आहे. मात्र, यापूर्वी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना व्हि. बी. पाटील यांनी शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्हाला विचारात घेतलं जात नसल्याचा आरोप करण्यात आला.

महाविकास आघाडी म्हणजे एकटे सतेज पाटील आहेत का ? त्यांनी आम्हाला देखील विचारात घेतलं पाहिजे होते. सर्व प्रभागांमध्ये आम्हाला एक जागा हवी आहे. नावासह प्रस्ताव आम्ही काँग्रेसला दिला होता.सतेज पाटील यांच्यासोबत तीन वेळा बैठक झाली. मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.

शेवटी 14 जागीं संदर्भात आम्ही समर्थता दर्शवली मात्र समोरून प्रतिसाद नाही. त्यांनी परस्पर बाहेरचे उमेदवार दिले त्यामुळे आमची त्यांच्यावर नाराजी आहे. काँग्रेस बद्दल आमची नाराजी तीव्र आहे त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. असेही व्हि. बी पाटील म्हणाले.

वेगवेगळी कारणे सांगून काँग्रेस आमच्या पक्षाला आणि उमेदवाराला दाबण्याचे प्रयत्न करत आहेत. कालच्या पत्रकार परिषदेला आम्हाला त्यांनी विचारलं नाही. त्यांनी आघाडी म्हणून आम्हाला बोलवायला पाहिजे होतं. आजचा दिवस त्यांना अल्टिमेटम दिलेला आहे. उद्या आम्ही आमचे पर्याय घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. इतर पर्याय बघून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने 'एकला चलो रे' ची भूमिका घेण्याची तयारी ठेवली आहे.

अजित पवार राष्ट्रवादीचा प्रस्ताव आल्यास आम्ही आनंदी आहोत. पण इंडिया आघाडीने आज सायंकाळपर्यंत आम्हाला सांगावा द्यावा.आज सायंकाळपर्यंत आपली भूमिका जाहीर करावी. आमच्याकडे तिसरा पर्याय उपलब्ध आहे. आमच्याकडे 35 लोकांच्या मुलाखती झालेल्या आहेत. आम्ही 14 सीट्सवर ठाम आहोत. काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद नाही. असेही पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT