Uddhav Thackeray, Raj Thackeray
Congress and Thackeray Sena leaders during a key meeting on Kolhapur municipal election seat sharing amid MVA alliance discussions.Sarkarnama

Kolhapur Politics : ठाकरे बंधूंचं ज्यादिवशी मुंबईत जमलं त्याचदिवशी कोल्हापुरात फाटलं : मनसेचा प्रस्ताव धुडकावून उबाठा-काँग्रेस एकत्र

Kolhapur Municipal Election MVA Seat-Sharing : मविआमध्ये 81 पैकी केवळठाकरेंच्या शिवसेनेच्या 7 जागांवर एकमत झाले असून उर्वरित 5 जागांवर खलबत्ते सुरू आहेत. शिवाय एका स्वीकृत जागेवर देखील सेनेने दावा केला आहे. मात्र जोपर्यंत एबी फॉर्म हातात येत नाही. तोपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा मिळाल्या? हे गुलदस्त्यातच राहणार आहे.
Published on

Kolhapur News, 25 Dec : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने प्रचारात आघाडी घेतल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून चर्चेचं घोडं अडलं होतं.

अखेर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील आणि ठाकरे सेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यात झालेल्या चर्चेनुसार काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. मात्र तब्बल ३३ जागांवर दावा करणाऱ्या ठाकरे सेनेला केवळ बारा जागांवरच समाधान मानावे लागले.

काँग्रेस समोर ठाकरेंच्या सेनेचे अवसान गळालं, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये 81 पैकी केवळठाकरेंच्या शिवसेनेच्या सात जागांवर एकमत झाले असून उर्वरित पाच जागांवर खलबत्ते सुरू आहेत. शिवाय एका स्वीकृत जागेवर देखील ठाकरे सेनेने दावा केला आहे. मात्र जोपर्यंत एबी फॉर्म हातात येत नाही.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Prashant Jagtap : खुमखुमी असेल तर स्वत:चा पक्ष काढ म्हणणाऱ्या मिटकरींची प्रशांत जगतापांनी लायकीच काढली; म्हणाले, 'तडजोड करणाऱ्या, फुटकळ आमदाराच्या...'

तोपर्यंत ठाकरेंच्याशिवसेनेला कोल्हापुरात नेमक्या किती जागा मिळाल्या? हे गुलदस्त्यातच राहणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढणार याबाबतचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, आमदार जयंत असगावकर, ठाकरे सेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, राजेश लाटकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. राष्ट्रवादीसोबत आमची चर्चा सुरू आहे. काही जागांचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. आम आदमी पक्षासोबत मैत्रीपूर्ण लढत ठरलेली आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र लढलो आहे. आज जरी एकत्र लढत नसलो तरी पुढील काळात इंडिया आघाडी म्हणून मला सर्वांना सोबत घेऊन जावे लागेल. त्यामुळे कुणाला कमी लेखून चालणार नाही.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Shivsena UBT : 'भाजपला 'अखंड महाराष्ट्र' कल्पनाच मान्य नाही, लुटीतला वाटा टाका आणि मुंबईचा लिलाव...;' ठाकरेंच्या युतीनंतर सामनातून हल्लाबोल

ठाकरेंच्या शिवसेनेला आघाडीत 12, आणि स्विकृत 1 जागेचा प्रस्ताव दिला आहे. अशी आमदार सतेज पाटील यांनी माहिती दिली. तर काही ठिकाणी एका घरात दोन उमेदवारी जाणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने 21 वर्षांपूर्वी ताटातूट झालेले दोन बंधू एकत्र आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र युतीची घोषणा केली.

मात्र कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेने आणि काँग्रेसने मनसेचा प्रस्ताव धूडकावून लावाला आहे. मनसेकडून आलेला प्रस्ताव हा समितीला मान्य नसल्याचे ठाकरे सेनेचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी स्पष्ट केले. मात्र हा प्रस्ताव नेमका काय होता यावर भाष्य करणे टाळले. मनसेच्या प्रस्तावाबाबत आपण वरिष्ठ नेत्यांची चर्चा करण्याचा सल्ला दिला असल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com