Kolhapur Politics : नगरपालिका जिंकताच ZP साठी तयारी : शिवसेना आमदाराच्या मागणीला CM फडणवीसांची मान्यता

Zilla Parishad election : जिल्हा परिषद निवडणुकीआधी आमदार राजेंद्र यड्रावकर यांनी रत्नागिरी–नागपूर महामार्ग भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळवून देत राजकीय मास्टर स्ट्रोक खेळला.
MLA Rajendra Patil Yadravkar meeting farmers after the state government approved fourfold compensation for land acquisition on the Ratnagiri–Nagpur highway.
MLA Rajendra Patil Yadravkar meeting farmers after the state government approved fourfold compensation for land acquisition on the Ratnagiri–Nagpur highway.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : मागील काही वर्षांपासून रखडलेल्या नागपूर-रत्नागिरी महामार्गावरील अंकली ते चोकाक या पट्ट्यातील शेतकऱ्यांना चौपट मोबदला देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. शिवसेनेचे सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. यड्रावकर यांना या निर्णयाचा फायदा आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अंकली ते चोकाक या पट्ट्यातील भूसंपादन रखडले होते. चौपट मोबदला मिळावा यासाठी शेतकरी संघटनांसह अनेक जण आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. पण अखेर जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे. शेतकऱ्यांना चौपट मोबदला मिळणार असल्याने भूसंपादन गतीमान होणार होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी–नागपूर महामार्गाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती, विहीर आणि अन्य मालमत्ता बाधित झाली होती. या महामार्गाच्या बहुतांश टप्प्यांत शेतकऱ्यांना चौपट दराने मोबदला देण्यात आला होता. मात्र अंकली ते चोकाक या 33 किलोमीटरच्या टप्प्यात अधिग्रहित जमीनधारक शेतकऱ्यांना दुप्पट दराने भरपाई देण्याचा प्रस्ताव होता. त्यामुळे शिरोळ आणि हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता.

MLA Rajendra Patil Yadravkar meeting farmers after the state government approved fourfold compensation for land acquisition on the Ratnagiri–Nagpur highway.
Kolhapur Politics : ठाकरे बंधूंचं ज्यादिवशी मुंबईत जमलं त्याचदिवशी कोल्हापुरात फाटलं : मनसेचा प्रस्ताव धुडकावून उबाठा-काँग्रेस एकत्र

या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चे, आंदोलनं करून महामार्गाचे कामही अनेकदा बंद पाडले होते. महामार्गासाठी इतर भागात चौपट दर मिळत असताना शिरोळ आणि हातकणंगले भागात शेतकऱ्यांना दुप्पट दर देणे हा गंभीर अन्याय आहे. त्यामुळे संबंधित विभागाची तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा, अशी मागणी आमदार यड्रावकर यांनी केली होती. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे याबाबतचा पाठपुरावा केला होता.

MLA Rajendra Patil Yadravkar meeting farmers after the state government approved fourfold compensation for land acquisition on the Ratnagiri–Nagpur highway.
Shivsena UBT : 'भाजपला 'अखंड महाराष्ट्र' कल्पनाच मान्य नाही, लुटीतला वाटा टाका आणि मुंबईचा लिलाव...;' ठाकरेंच्या युतीनंतर सामनातून हल्लाबोल

शेतकऱ्यांना 76 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ

अंकली ते चोकाक या भागात 937 खातेदार असून, दुप्पट दराने 94 कोटी रुपये मिळणार होते. मात्र आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शासनाने चौपट दरास मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांना एकूण 171 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 76 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com