A. Y. Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Political News : कोल्हापुरात महायुतीला आणखी एक खिंडार; 'या' नेत्याने अजित पवार यांच्याकडे दिला राजीनामा

Ncp News : बुधवारी दिवसभरात महायुतीच्या दोन नेत्यांनी राजीनामा देत महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची लगीनघाई सुरु झाली आहे. त्यातच कोल्हापूरमध्ये महायुतीला धक्यावर धक्के बसत आहेत. बुधवारी दिवसभरात महायुतीच्या दोन नेत्यांनी राजीनामा देत महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बुधवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. बुधवारी दिवसभरात महायुतीतील दोन मोठ्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे महायुतीपुढील संकटात भर पडली आहे. बुधवारी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. (Kolhapur Political News)

ए. वाय. पाटील यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीधर्म डावलून काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यांनी राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. गेल्या चार महिन्यापासून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काम थांबविले होते.

कोल्हापुरात बुधवारी भाजपला खिंडार पडण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते आणि माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा असताना आता भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले राजीनामापत्र ई-मेलद्वारे पक्ष नेतृत्वाकडे पाठवला आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश आबिटकर हे विद्यमान आमदार आहेत. महायुतीतील राष्ट्रवादीचे दोन्ही नेते माजी आमदार के. पी. पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय. पाटील हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे येत्या काळात या ठिकाणी चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत महत्त्वकांक्षा वाढल्याने ए. वाय. पाटील यांनी काँग्रेससोबत घरोबा सुरु केला. लोकसभा निवडणुकीनंतर उमेदवारी मिळवण्यासाठी के. पी. पाटील यांनी महाविकास आघाडीशी जवळीक साधली आहे. सध्या या दोघांनीही आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे हे दोघेही उद्याच्या मेळाव्याला उपस्थिती लावणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT