Patna News, 21 August : देशभरात विविध संघटनांनी अनुसूचित जाती-जमाती आरक्षणात क्रिमीलेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बुधवारी (ता. 21 ऑगस्ट ) रोजी 14 तासांसाठी भारत बंदची हाक दिली आहे.
मात्र, भारत बंदच्या या आंदोलनास बिहारच्या पाटणा (Patna) येथे हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. यावेळी आंदोलकांना शांत करण्यासाठी आलेल्या उपजिल्हाधिकारी साहेबांवरच काही पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
या घटनेमुळे पोलिस आणि प्रशासन यांच्यात काही काळ तणाव निर्माण झाला होता. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने उपजिल्हाधिकाऱ्यांवर लाठीचार्ज करताना पाहताच त्यांनी लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसाला थांबवलं. मात्र, यावेळी यानंतर उपजिल्हाधिकारी साहेब पोलिसावर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, पोलिसाने (Police) आपल्याकडून हे चुकून झाल्याचं सांगत माफी मागितली.
मात्र, या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या उपजिल्हाधिकाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे त्यांचे नाव श्रीकांत कुंडली खंड असं आहे. बंद दरम्यान दंगा करणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका घेतली.
यावेळी जबरदस्ती बाजारपेठ बंद करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना थांबवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. भारत बंद (Bharat Bandh) दरम्यान पटना येथील चौकात डिजे आणि हातगाडे घेऊन आलेल्या आंदोलकांच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी लाठीचार्ज केला.
यावेळी उपजिल्हाधिकारी तेथील एका गाड्यावरील जनरेटर बंद करण्यासाठी गेले. त्याचवेळी एका पोलिसाने थेट त्यांच्यावर लाठीचार्ज सुरू केला. व्हिडिओमध्ये उपजिल्हाधिकारी पांढरा शर्ट घातलेले दिसत आहे. या दरम्यान एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांने हा सर्व प्रकार पाहताच त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसाला रोखलं.
मात्र, तोपर्यंत उपजिल्हाधिकारी साहेबांना काही काठ्या खाव्या लागल्या होत्या. या सर्व प्रकारानंतर पोलिसाने खंत व्यक्त करत आपल्याकडून हे चुकून झाल्याचं सांगितलं. तर व्हिडीओमध्ये पोलिस उपजिल्हाधिकाऱ्यांची माफी मागतानाही दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.