Kolhapur News : कोल्हापूर महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकांची निवड झाली. त्यावर 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभेत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. या महासभेत निवड केलेल्या स्वीकृत नगरसेवकांची शिफारस आयुक्ताकडून होणार आहे. मात्र यंदाही स्वीकृत नगरसेवक निवड महापालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा गाजण्याची शक्यता आहे. एकमेकांच्या राजकारणातील उट्टे काढण्याची वेळ आता परस्पर उलट फिरल्याने यावेळी देखील महापालिकेचे सभागृह स्वीकृत नगरसेवकाच्या पदावरून वादंग होण्याची शक्यता आहे.
2015 मधील निवडणुकीनंतर स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीदरम्यान माजी महापौर सुनील कदम यांच्या सभागृहातील प्रवेशाला ब्रेक लावण्याच्या प्रकार घडला होता. आता त्याचे उट्टे काढण्याचा प्लॅन सुनील मोदी यांच्या बद्दल सुनील कदम यांच्याकडून आखला जात आहे. फरक फक्त इतकाच होता की, त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. आता महायुतीचे सरकार महापालिकेत आहे. त्यामुळे मोदी यांना ब्रेक लावण्यासाठी कदम हे फिल्डिंग लावण्याच्या तयारीत आहेत.
कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीची सत्ता असली तरी सर्वात मोठा काँग्रेस पक्ष हा विरोधी बाकावर आहे. काँग्रेसकडे अनुभवी नगरसेवकांची फौज असली तरी स्वीकृत नगरसेवकांच्या निवड प्रक्रियेत काँग्रेसनेच अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्वाला संधी दिली आहे. त्यामध्ये माजी नगरसेवक राहुल माने आणि माजी उपमहापौर सुनील मोदी यांचा समावेश आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांकडे अनुभव असणाऱ्या नगरसेवकांची फौज तयार आहे. त्याची खबरदारी काँग्रेस घेतलेली दिसते.
2016 नंतर कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची सत्ता आली. त्यावेळी काँग्रेसचे 29 राष्ट्रवादीचे 14 तर शिवसेनेचे चार सदस्य होते. तर विरोधी आघाडीकडून ताराराणी आघाडीचे 19 तर भाजपचे 14 असे एकूण 33 नगरसेवकांचे संख्याबळ होते. तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता. तर स्वीकृत साठी काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून प्रा. जयंत पाटील, मोहन सालपे, तौफिक मुल्लाणी यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली.
ताराराणी व भाजप आघाडीकडून माजी महापौर सुनील कदम व किरण नकाते यांचे अर्ज होते. सभागृहात सुनील कदम वगळता इतर चौघांच्या नावाला मान्यता दिली तर कदम यांच्या अर्जाला सत्ताधाऱ्यांनी आक्षेप नोंदविला. सत्तेत असताना कदम यांनी केलेल्या काम यावर आक्षेप घेत विरोध दर्शवीला होता.
या प्रकारणनंतर कदम यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करायची की नाही यावरुन सत्ताधारी व विरोधक सभागृहात आमनेसामने उभे ठाकले. जवळपास सात ते आठ महिने हा वाद धुमसत होता. त्यावेळी तात्कालीन सत्ताधाऱ्याकडून नगरसेविका अड. सूरमंजिरी लाटकर, प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुखही कदम यांच्या विरोधात सभागृहात होते. तर विरोधी आघाडीकडून सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, रूपाराणी निकम हे लढायचे.ज्यावेळी हे प्रकरण कोर्टात गेले त्यावेळी कदम यांच्या बाजूने निकाल लागला.
आता हीच संधी सुनील कदम यांच्याकडे चालून आले आहे. कारण महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आहे. शिवाय प्रा. जयंत पाटील, शारंगधर देशमुख महायुतीत आहेत. तर रूपाराणी निकम या महापौर आहेत. काँग्रेस विरोधी बाकावर आहे. काँग्रेसकडून स्वीकृतसाठी निवड केलेल्या तीन नावापैकी सुनील मोदी यांच्या अर्जाला सत्ताधाऱ्यांकडून विरोध होण्याची चिन्हे दिसत आहेत. तशा हालचाली सुनील कदम यंच्याकडुन सुरु आहेत.
मोदी यांना सहगृहाचा, कायद्याचा मोठा अभ्यास आहे. सभागृहातील काँग्रेसची ताकद म्हणून ओळखले जाणार आहे. मात्र ज्या करणावरून सुनील कदम यांना विरोध झाला. त्याचं कारणावरून सुनील मोदी यांना विरोध होण्याच्या हालचाली सुरु आहेत. या साऱ्या प्रकरणात महापौरांना विशेषाधिकार असतो. सध्या महापालिकेत महायुतीची सत्ता आहे आणि महापौर हा भाजपाचा आहे. त्यामुळे त्याला अधिक रंगत येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.