Political leaders campaign intensely during the Kolhapur Municipal Corporation election, highlighting the fierce Mahayuti vs MVA contest ahead of voting day. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Municipal Election : सतेज पाटलांचे अस्तित्व पणाला; सत्तेला सुरूंग लावण्यासाठी महाडिक-क्षीरसागरांनी लावला जोर...

Kolhapur Municipal Election 2026 : काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील एकाकी पडले असताना महायुतीच्या सर्वच नेत्यांनी त्यांना घेरले. अशा परिस्थितीत येणाऱ्या 16 जानेवारीला सतेज पाटील यांचे राजकीय अस्तित्व आणि महायुतीच्या नेत्यांची प्रतिष्ठा सर्वांसमोर येणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिका निवडणुकीचा निकालात महायुतीच्या सर्वच पक्षांनी बाजी मारली.

Rahul Gadkar

Kolhapur News, 14 Jan : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मागील पंधरा दिवसांपासून धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी सहा वाजता थंड झाल्या. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना होत असताना आरोप-प्रत्यारोपांनी यंदाची निवडणूक गाजली आहे.

उद्या प्रत्यक्ष मतदान होणार असल्याने जवळपास 400 हून अधिक उमेदवारांचे भविष्य मतदान पेटीत बंद होणार आहे. येणाऱ्या 16 जानेवारी रोजी मतदार राजा आपल्या शहरातील 81 प्रभावी चेहरे निवडणार आहे. मात्र पंधरा दिवस सुरू असलेल्या राजकीय आरोप प्रत्यारोप आणि कोल्हापूरची निवडणूक चांगलीच गाजली.

इतकेच नव्हे तर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील एकाकी पडले असताना महायुतीच्या सर्वच नेत्यांनी त्यांना घेरले. अशा परिस्थितीत येणाऱ्या 16 जानेवारीला सतेज पाटील यांचे राजकीय अस्तित्व आणि महायुतीच्या नेत्यांची प्रतिष्ठा सर्वांसमोर येणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नगरपालिका निवडणुकीचा निकालात महायुतीच्या सर्वच पक्षांनी बाजी मारली.

त्यामुळे एकाकी पडलेल्या काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या ताब्यातील असलेली कोल्हापूर महानगरपालिका घेण्यासाठी महायुतीने आपले सर्वस्व पणाला लावले आहे. गेल्या पंधरा वर्षात कोल्हापूरचा झालेला विकास, थेट पाईपलाईन, रस्ते या मुद्द्यांवरून महायुतीचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांनी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या विरोधात थेट आरोप करत राजकीय प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला.

मात्र प्रत्येक मुद्द्यांवर काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ जारी करत सत्तेतील आमदारांवर 40 लाखांचा आरोप केला आहे. एकीकडे महायुतीचे सर्व नेते असताना दुसरीकडे मात्र एकटे सतेज पाटील यांना तोंड देत आहेत. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील 10 मतदारसंघ ताब्यातून गेल्यानंतर नगरपालिका निवडणुकीत देखील काँग्रेसची पीछेहाट झाली.

अशा परिस्थितीत महानगरपालिका देखील ताब्यात घेण्यासाठी महायुतीने सर्व राजकीय सर्वस्व पणाला लावले आहे. महायुती म्हणून भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांमध्ये शेवटपर्यंत जागा वाटपावरून तानातानी झाली. मात्र काँग्रेसने बऱ्याचशा मतदारसंघात केवळ काँग्रेसचा हात दिल्याने मतदारांसमोर सहज पोहोचता आले आहे.

मात्र शेवटच्या दोन दिवसातील राजकीय घडामोडी पाहता काँग्रेसमध्ये काही मतदारसंघात समन्वय न राहिल्याचे चित्र आहे. ज्या ठिकाणी प्रबळ उमेदवार आहे. त्याच प्रबळ उमेदवाराला मतदान करा. प्रचार व्यवस्था ठेवल्याने अन्य उमेदवार नाराज झाल्याचे चित्र आहे. तर महायुतीमध्ये उमेदवारांमध्ये समन्वय दिसून येत नाही. मात्र पॅनेल पातळीवर मतदान करण्याचा आव्हान महायुतीकडून होताना दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT